Home Entertainment अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अचानक आला एकनाथ शिंदे यांचा फोन...

अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अचानक आला एकनाथ शिंदे यांचा फोन म्हणाले

1108
0
eknath shinde on hardik akshaya wedding
eknath shinde on hardik akshaya wedding

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाचं फुटेज काही संपता संपेना. अक्षयाच्या साडी, ओढणीपासून ते हार्दिकच्या गळ्यातील रूद्राक्षमाळेपर्यंत त्यांच्या लुकची जोरदार चर्चा झाली. हार्दिक आणि अक्षया यांनी लग्नासोबतच रिसेप्शनचही दणक्यात केलं. रिसेप्शनला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी नव्या जोडीला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. अक्षया आणि हार्दिक यांनी रिसेप्शनसाठी जांभळ्या रंगाचा कॉम्बो लुक केला होता. रिसेप्शनसाठी ही जोडी स्टेजवर शुभेच्छा स्वीकारत असताना अचानक कुणीतरी त्यांच्या हातात फोन आणून दिला. हॅलो, म्हणताच पलिकडून जी व्यक्ती बोलत होती ते ऐकून हार्दिक आणि अक्षया पार हरखूनच गेले, कारण तो फोन होता खास व्यक्तीचा. ज्यांचं नाव होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

hardeek joshi wedding reception
hardeek joshi wedding reception

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्न जरी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केलं असलं तरी रिसेप्शनला त्यांनी अनेकांना आमंत्रित केलं होतं. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी या लग्नाला आवर्जुन उपस्थिती लावली होती. एकीकडे नववधू-वर आलेल्या पाहुण्यांना भेटत होते, सारं काही सुरळीत सुरू होतं आणि अचानक एकनाथ शिंदे यांचा हार्दिकला व्हिडिओ कॉल आला. यावेळी त्यांनी नवदाम्पत्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. हार्दिकने त्यांना लग्नाचं निमंत्रण दिलं होतं, मात्र व्यग्र कामांमुळे मुख्यमंत्र्यांना लग्नाला उपस्थित राहता आलं नाही. याचमुळे त्यांनी व्हिडिओ कॉल करून दोघांना शुभेच्छा दिल्या. टीव्ही स्टार कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी २ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाच्या सर्व विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आजही सोशल मीडियावर शेअर होत आहेत. विशेष म्हणजे हार्दिक आणि अक्षयानेही मोठ्या उत्साहाने प्रसारमाध्यमांना त्यांच्या खास क्षणांचे सोबती केल्याने चाहत्यांकडून त्यांचं कौतुक होत आहे. अशात आता सोशल मीडियावर अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवदाम्पत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यावेळी एकनाथजी ह्या दोघांना काय म्हणाले ते पाहुयात.

akshaya hardik wedding reception photo
akshaya hardik wedding reception photo

शिंदे म्हणाले की, ‘तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इतर कामांमुळे मी येऊ शकलो नाही यासाठी माफ करा. पण नंतर नक्की भेटू. पुन्हा एकदा शुभेच्छा.’ यावर हार्दिक आणि अक्षयानेही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. हार्दिक म्हणाला की, ‘काही हरकत नाही. आपण नक्की भेटू. मी ठाण्यात आलो की भेटतो तुम्हाला. तुमच्या घरीच भेटू. मुख्यमंत्री शिंदे यांच्या व्हिडिओ कॉलवरून आलेल्या शुभेच्छा अक्षया आणि हार्दिक यांनी मनापासून स्वीकारल्या. या जोडीच्या लग्नातील प्रत्येक क्षण सोशलमीडियावर प्रचंड लाइक्स मिळवत असताना मुख्यमंत्री शिंदे आणि श्री व सौ जोशी यांचा व्हिडिओकॉलही चांगलाच चर्चेत आला. आपलं लग्न थाटामाटात व्हावं असं तर प्रत्येकालाच वाटत असतं. यात अक्षया आणि हार्दिक काही वेगळे नाहीत. त्यामुळे त्यांनी अगदी ग्रँड वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. मेंदी, हळद, संगीत आणि लग्न असा भरगच्च कार्यक्रम त्यांनी आखला आणि त्याची विशेष तयारीही केली. महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक दिवशी स्टार कपल अगदी उठून दिसत होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here