डिसेंबर महिना सुरु झाला आणि एकामागून एक मराठी कलाकारांची लग्न झालेली पाहायला मिळाली. राणा आणि अंजली हि छोट्या पडद्यावरील जोडही २ डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकली. त्यांनतर अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनी देखील त्याच दिवशी लग्न केलं. ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील सुमित पुसावळे याने मोनिका महाजन सोबत लग्नगाठ बांधली. तर ‘तुमची मुलगी काय करते’ मालिका फेम हरीश दुधाडे याने समृद्धी निकम या मॉडेल सोबत लग्नगाठ बांधली. डिसेंबर महिना सुरु झाल्यापासून मराठी कलाकार लग्न बंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. ह्यात आता आणखीन एका छोट्या पडद्यावरील अभिनेता आणि अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे.

अभिनेता चेतन वडनेरे मूळचा नाशिकचा इथेच त्याने शालेय तसेच पदवीचे शिक्षण घेतले होते अभिनयाच्या ओढीने त्याची पावले मुंबईकडे वळली. नाटक, एकांकिका गाजवत असताना स्टार प्रवाहवरील लेक माझी लाडकी या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या ठिपक्यांची रांगोळी हि मालिका सुरु आहे. मालिकेतील शशांक हे मुख्य पात्र अभिनेता चेतन वडनेरे साकारताना पाहायला मिळत आहे. अभिनेता चेतन वडनेरे हा बऱ्याच दिवसांपासून एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्यासोबत एक फोटो शेअर करत आहे या फोटोवरून यो अभिनेत्री ऋजुता धारप हिला डेट करत असल्याचे बोलले जात होते. अभिनेता चेतन वडनेरे हा झी मराठीवरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. झी युवा वरील फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेत तो झळकला याच मालिकेत ऋजुता धारप देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसली. परवा १८ तारखेला ऋजुताने आपल्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लवकरच लग्न करणार असं देखील तिने त्यात लिहलं होत.

फुलपाखरू मालिकेतून चेतन आणि ऋजुता यांची ओळख झाली होती. आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि आता लग्नात होताना पाहायला मिळत आहे. गेली ४ वर्ष हे एकमेकांना डेट करत होते. नुकताच अभिनेत्री ऋजुता धारप हिने मेहेंदीचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत लग्न करत असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. दोघांच्या घरी लग्नाची लगबग असू झाली आहे. काल १९ डिसेंबर २०२२ रोजी अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप या दोघांनी अनेक कलाकार आणि मित्रमंडळींच्या उपस्तिती साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसातच हे दोघे लग्नगाठ बांधताना पाहायला मिळणार आहेत. असो अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…