ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल भारतीय वंशाची विनी रमण हिच्यासोबत लवकरच लग्नाची गाठ बांधणार आहे. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाची आता सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. विनी रमण हिने तिच्या सोशल अकाऊंटवरून मॅक्सवेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यात तिने म्हटले आहे की २०२२ हे साल आपलं असणार आहे. त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाची बातमी आता निश्चित झाली आहे. विनी ही ग्लेन मॅक्सवेलची गर्लफ्रेंड असून गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा केला होता.

मॅक्सवेल आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) या टीमसाठी खेळतो आणि तो अस्ट्रेलियाचा तो एक तगडा खेळाडू म्हणूनही परिचित आहे. २०१९ साली मॅक्सवेल क्रिकेतपासून थोडासा बाजूला राहिला होता त्याच्या गर्लफ्रेंडमुळेच त्याचे मानसिक संतुलन ढासळले अशी त्यावेळी चर्चा होती. मात्र या बातमीत कुठलेच तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते उलट विनीने मला त्या कठीण काळात खूप साथ दिली होती, मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी मला तिने खूप आधार दिला होता शिविवाह पहा कोण आहे ती वाय चांगल्या सल्ल्याची आवश्यकता आहे असेही तिने त्यावेळी सूचित केले होते. तिच्याचमुळे मी ह्या कठीण काळातून स्वतःला सावरू शकलो होतो असे तो त्यावेळी म्हणाला होता. सध्या आयपीएल सामन्यात आरसीबी टीमला आलेल्या अपयशामुळे खेळाडूंना ट्रोल करण्यात आले होते यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. मॅक्सवेल आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळला पण त्यांना यश आले नाही.

ग्लेन मॅक्सवेल हा दुसरा असा खेळाडू आहे जो भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न करणार आहे याअगोदर २०१४ साली ऑस्ट्रेलियाचाच खेळाडू शॉन टेट ने भारतीय वंशाच्या मासुम सिंघा हिच्यासोबत लग्न केलं होतं. हे दोघेही आयपीएलच्या पार्टीत एकत्र भेटले होते. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न केले होते. मॅक्सवेल आणि विनी हे दोघे २०१७ सालापासून एकमेकाना डेट करत आहेत. २०१९ साली मॅक्सवेलने विनीला ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड सोहळ्यात नेले होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी युरोप ट्रिप केली होती. हे दिघेही आपल्या इन्स्टाग्रामवरून एकत्र असलेले फोटो नेहमी शेअर करताना दिसतात. विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे वास्तव्यास आहे. एक फार्मसिस्ट म्हणून ती तिथे कार्यरत असल्याचे सांगितले जाते. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुवर्ण क्षणांसाठी खूप खूप शुभेच्छा…