“नांदा सौख्य भरे” मालिकेतील वच्छी आत्या म्हणून ओळख झालेली आणि सर्वांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री वर्षा दांदळे हिच्यावर खूपच वाईट वेळ आली आहे. सोशिअल मीडियावर अभिनेत्री वर्षा दांदळे ह्यांनी नुकतच आपल्या फोटोसह मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे असं म्हणत एक वाईट बातमी दिली आहे. त्या म्हणतात Major accident…spine injury…right leg damaged Aap sabke dua ki jarurat hai” काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला असून या अपघाताने त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे दिसून येते. या अपघातात त्यांच्या पाठीला जबरदस्त दुखापत झाली आहे त्यामुळे मणक्याच्या त्रास वाटू लागला आहे शिवाय उजव्या पायाला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

पेशाने संगीत शिक्षिका असलेल्या वर्षा दांदळे यांना काही नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचं नाटकांतील काम पाहून त्यांना मालिकेत झळकायची सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संधीच त्यांनी सोनं केलं. नांदा सौख्य भरे या मालिकेतील वच्छी आत्या घराघरात पोहचली आणि या भूमिकेनंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. नकटीच्या लग्नाला यायचं ह ह्या मालिकेत लता काकुंची भूमिका साकारली. या मालिकेनंतर घाडगे अँड सून मालिकेत सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ साकारली. काही दिवसांपूर्वी झळकलेले “पाहिले ना मी तुला”या मालिकेतील उषा मावशी च हळवं रूप देखील प्रेक्षकांना खूपच भावलं. या मालिकेत त्यांचा हळवा, रागीट आणि प्रेमळ स्वभाव पाहायला मिळाला. अभिनय कोणताही असो तो त्या पात्राला त्यांनी नेहमीच योग्य न्याय दिला. अपघातामुळे त्यांची परिस्थिती देखील खूपच नाजूक झाली असून त्या आता अंथरुणाला खिळून आहेत. यामुळेच त्यांनी चाहत्यांना मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे असे म्हटले आहे. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना …