अनेक मराठी तसेच बॉलीवूड कलाकार अभिनय सोडून आपला व्यवसाय किंवा आवडत ते क्षेत्र निवडतात. प्रसिद्धी म्हणजेच सर्व काही हे समीकरण त्यांना लागू होत नाही. असच काहीस घडलंय मराठी मालिकेतील अभिनेत्रीच्या आयुष्यात. मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून अमाप प्रसिद्ध मिळालेली अभिनेत्री नेहा गद्रे हिने मालिकेत गौरीची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तिने अजूनही चांदरात आहे या मालिकेत देखील प्रमुख भूमिका साकारली होती. मालिकाच नव्हे तर “मोकळा श्वास” आणि “गडबड झाली” या चित्रपटात देखील ती प्रमुख भूमिकेतच पाहायला मिळाली. साधारण ३ वर्षा पूर्वी अभिनेत्री नेहा गद्रे हीच ईशान बापट ह्याच्याशी लग्न झालं. १० जुलै २०१८ मध्ये कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत नेहाने साखरपुडा उरकला. त्यानंतर साधारण ८ महिन्यांनी म्हणजेच २ मार्च २०१९ ला ती विवाह बद्ध झाली.

अभिनेत्री नेहा गद्रे हि लग्नानंतर अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय पाहायला मिळाली नाही. त्याच कारण देखील अगदी तसेच आहे. अभिनेत्री नेहा गद्रे हि लग्नानंतर आपला पती ईशान बापट सोबत ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली. याच कारणामुळे गेली ३ ते ४ वर्ष नेहा गद्रे मराठी चित्रपट सृष्टीपासून लांब गेलेली पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियात राहून नेहाने पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. नुकतेच नेहा गद्रे बापट हिने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली. हि पदवी मिळवण्यासाठी तिला पतीने खूप साथ दिली असल्याचं नेहा सांगते. नेहा म्हणते की, दोन वर्षांच्या मेहनतीनंतर मी ही पदवी मिळवली आहे याचा मला आनंद आहे. जवळपास एक दशक मी अभिनेत्री म्हणून काम केलं त्यानंतर वेगळ्या देशात येऊन नवीन कॅरियर सुरू करणे अजिबात सोपे नव्हते. माझ्यासाठी ही एक रोलर कोस्टर राईड आहे, परंतु मी जिथे पोहोचले त्याचा मला अभिमान आहे. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या माझ्या आई आणि बाबांचे आभार. काही दिवस जेव्हा मला माझ्या आयुष्याबद्दल आणि माझ्या कारकिर्दीबद्दल मला अनाकलनीय वाटले. तुमच्या माझ्यावरील याच विश्वासाने मला पुन्हा खंबीर केले. मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करते. मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या भावाला आणि माझ्या नवऱ्याला कशी विसरेल. या सर्वांसाठी तुमचे मनापासून आभार!”

अभिनेत्री नेहा गद्रे बापट हि सध्या ऑस्ट्रेलियात असली तरी मराठी चित्रपट आणि मालिका पाहायला तिला अजूनही आवडतात असं ती म्हणते. ऑस्ट्रेलियात राहून तिचा लूक थोडा वेगळा आणि स्टाईलिश झालेला पाहायला मिळतो. आपला पती ईशान बापट ह्यांच्यासोबत ती नेहमीच फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करताना पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियात राहून तिने साजरी केलेली दिवाळीचे फोटो तिने शेअर केले होते. पिवळ्या रंगाची साडी परिधान करून घरासमोर रांगोळी कधीं आकाश कंदील आणि दिवे लावून तिने ऑस्ट्रेलियातून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. फक्त दिवाळीच नाही तर अनेक भारतीय सण ती भारतीय पद्धतीने साजरी करते. अभिनय क्षेत्रापासून ती दूर गेली असली तरी आता तिने नवे क्षेत्र निवडले आहे. ऑस्ट्रेलियात आता शिक्षिका म्हणून काम करताना ती पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री नेहा गद्रे बापट हिला तिच्या आयुष्याच्या ह्या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..