मराठी चित्रपट सृष्टीतला सर्वांचा आवडता कलाकार अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता जोशी सराफ आजही रंगभूमीवर काम करताना पाहायला मिळतात. अशोक मामा आजही अनेक नाटकांमधून तर आणि काही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तर पत्नी निवेदिता अशोक सराफ ह्या आजही मराठी मालिका करताना पाहायला मिळतात. निवेदिता सराफ याना विविध प्रकारच्या रेसिपी करायची भारी आवड त्यामुळेच त्यांनी युट्युबवर आपल्या रेसिपी चाहत्यांशी शेअर करताना पाहायला मिळतात. निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या मुलाचं नाव “अनिकेत सराफ” असं आहे. अनिकेत सराफ याला तुम्ही शेफ म्हणून ओळखत असाल पण आता त्याने वेगळं क्षेत्र निवडलेलं पाहायला मिळतंय. अनिकेत सराफ ह्याच्या बद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात..

अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा वयाच्या ८ व्या वर्षापासूनच नाटकांमध्ये काम करताना पाहायला मिळाला. इतकंच नाही तर आपल्या कॉलेजच्या दिवसात देखील तो विविध नाटकांमधून भूमिका करताना पाहायला मिळाला. कॉलेजमध्ये शिक्षण घेता घेता त्याने एक शॉर्ट फिल्म देखील बनवली होती. त्यातली गाणी, संवाद, लेखन, संगीत हे सगळं त्याने स्वतः केलं होत.आपल्या मुलाने कोणतं क्षेत्र निवडावं हा निर्णय त्यांनी सर्वस्वी अनिकेत वर सोडला होता. त्यामुळे त्याला काहीतरी करून दाखवायचं हे स्वप्न मनाशी बाळगून हॉटेल क्षेत्रात आपले पाय रोवले. Global Affair नावाने त्याने स्वतःचे हॉटेल देखील उभारले होते. ह्या हॉटेलमध्ये तो भारतीय आणि परदेशी पदार्थ स्वतःच्या हाताने बनवत होता. अनेक सेलिब्रिटी त्याच्या हॉटेलला आवर्जून भेट देताना पाहायला मिळत. यानंतर त्याने कॅनडामध्ये जाऊन वेगळं क्षेत्र निवडलं. आई वडलांच्या पावलावर पाऊल टाकत तो अभिनय क्षेत्राकडे वळला. (मुकाभिनय) Pantomime: The Wizard Of The Oz या कॅनडाच्या व्यावसायिक नाटकातून अभिनयास सुरुवात केली आहे. या नाटकात त्याने “ग्लिण्डा” (good witch )हे पात्र साकारले आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील स्वतः अनिकेत सराफ यानेच केलं आहे.

अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल कि अनिकेतला परदेशी भाषा अवगत असून तो फ्रेंच भाषा अगदी अस्खलित बोलतो त्यामुळे स्थानिक लोकांनाही तो तिथलाच असल्याचे वाटते. याशिवाय कॅनडात तो इंग्रजी भाषा शिकवण्याचे काम देखील करत आहे. अगथा क्रिस्टी यांच्या “स्पायडर्स वेब”, “माउस ट्रॅप” या परदेशी नाटकातही त्याने महत्वाची भूमिका बजावुन अभिनयाकडे वाटचाल सुरू केली. आज तो अभिनय, लेखन, दिग्दर्शन, शिक्षक, गीतकार यासोबतच एक उत्कृष्ट शेफ म्हणून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका उत्तमोत्तम बजावताना पाहायला मिळत आहे. लहानपणापासूनच अनिकेतला लिखाणाची आवड इंग्रजी भाषेतून कविता लिहिणे हा त्याचा एक छंदच होता. त्याचा हाच छंद त्याला स्वतःच्या आयुष्यात खूप फायदेशीर ठरताना पाहायला मिळत आहे. एका दिग्गज अभिनेत्याचा मुलगा भारतात राहून सहजपणे चित्रपटात किंवा मालिकेत काम मिळवू शकतो. पण शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अनिकेत सराफ ह्याची गोष्टच काही निराळी आहे. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेल्या अनिकेत अशोक सराफ ह्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…