Home Entertainment माझा होशील ना मालिकेतील अभिनेता विराजस कुलकर्णी याच हे नवं टॅलेंट...

माझा होशील ना मालिकेतील अभिनेता विराजस कुलकर्णी याच हे नवं टॅलेंट तुम्ही पाहिलंत

1261
0
virajas kulkarni actor
virajas kulkarni actor

माझा होशील ना या मालिकेतून विराजस कुलकर्णीचे छोट्या पडद्यावर आगमन झाले होते. मालिकेत त्याने साकारलेला आदित्य प्रेक्षकांना विशेष भावला होता. आजोबा जयराम कुलकर्णी आणि आई मृणाल कुलकर्णी यांच्या अभिनयाचा वारसा विराजस पुढे चालवत असला तरी त्याच्याकडे मल्टीटॅलेंटेड व्यक्तिमत्व असणारा हरहुन्नरी कलाकार म्हणून पाहिले जाते. रमा माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केलं याच चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका विराजसने सांभाळली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने मराठी सृष्टीत आगमन केले होते.

actor virajas kulkarni
actor virajas kulkarni

विराजस कुलकर्णीने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल मधून फिल्म मेकिंगचे धडे गिरवले आहेत यासोबतच उषा गांधी मॅनेजमेंटमधून त्याने जाहिरात क्षेत्रात बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी मिळवली आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक नाट्यस्पर्धां त्याने आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. यातील काही नाटकांच्या दिग्दर्शन आणि लेखनाची जबादारी देखील त्याने सांभाळली होती. लहानपणी चार्लीन चॅप्लिनचे अनेक चित्रपट पाहिले तो त्याचे चित्रपट स्वतः लिहायचा, दिग्दर्शित करायचा, अभिनित करायचा, संगीतही द्यायचा आणि एडिटिंग देखील तो स्वतःच करायचा त्यामुळे त्यांचा प्रभाव सुरुवातीपासूनच विराजसच्या अंतर्मनात रुजत गेला. यामुळे तुम्ही कुठल्याच बाबतीत अडून राहत नाहीत आणि सतत काहीतरी कामात व्यस्त राहू शकता असं तो आपल्या कामाबाबत सांगतो. वेबसिरीज असो वा नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याने अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शन अशा भूमिका बजावल्या आहेत. विराजसचा आणखी एक गुण म्हणजे तो बोलक्या बाहुल्यांना शब्दभ्रम करून तितक्याच चातुर्याने त्या बाहुल्यांना बोलते करतो.

virajas kulkarni with slapy
virajas kulkarni with slapy

नुकताच विराजसने त्याचा बोलका बाहुला Slappy सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात विराजस शब्दभ्रम करून स्लॅपीला बोलतं करताना दिसत आहे. कुणालाच कळू न देता विराजस इतकं सराईतपणे त्या बहुल्याला बोलतं करतोय की पाहणाऱ्यालाही हा बाहुलाच बोलत असावा असा भास होतो. विराजसचं हे टॅलेंट खरोखर कौतुकास्पद म्हणावं लागेल कारण त्याच्या ह्या व्हीडीओला सोशल मीडियावर पसंती देखील मिळत आहे. लवकरच विराजस त्याच्या स्लॅपीसोबत असेच आणखी काही मनोरंजनात्मक व्हिडीओ घेऊन येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो असे व्हिडीओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या व्हिडिओमुळे विराजस आता आणखी एका क्षेत्रात नाव गाजवताना दिसत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीला त्याच्या या नव्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here