Home Entertainment शेफाली वैद्य म्हणाल्या तुम्ही कुंकू लावा नाहीतर तुमच्या नेहमीच्या कळकट्ट पारोश्या घाणेरड्या...

शेफाली वैद्य म्हणाल्या तुम्ही कुंकू लावा नाहीतर तुमच्या नेहमीच्या कळकट्ट पारोश्या घाणेरड्या अवतारात झिंज्या सोडून नाचा तो तुमचा प्रश्न आहे

7726
0
spnalee and shefali photos

सध्या सोशल मीडियावर ‘हॅशटॅग नो बिंदी नो बिजनेस’ चा ट्रेंड तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तथाकथित जाहिरातींमधून झळकणाऱ्या मॉडेल्सनी टिकली न लावण्याने मी तरी तो ब्रँड खरेदी करणार नाही अशा मताच्या लेखिका आणि ब्लॉगर असलेल्या शेफाली वैद्य यांनी त्यांचं मत मांडलं आहे. हिंदूंचे सण आले की तुमचे ब्रँड खपवण्यासाठी तुमच्या जाहिरातीत तशाच स्वरूपाच्या मॉडेल तुम्ही दाखवत नाहीत यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. याबद्दल त्या अधिक काय म्हणाल्या ते पाहुयात…

shefali vaidya on sonalee look
shefali vaidya on sonalee look

“ओ फेमिनिष्ठ तै, तुम्ही कुंकू लावा नाहीतर तुमच्या नेहमीच्या कळकट्ट पारोश्या घाणेरड्या अवतारात झिंज्या सोडून नाचा, तो तुमचा प्रश्न आहे. मी काही फतवा काढलेला नाहीये की सर्व लेडीस बायकांनी बिंदी लावलीच पाहिजे. फतवा काढणारे लोक वेगळे असतात आणि तेव्हा तुम्ही ‘इट्स कल्चरल यु नो’ म्हणून बुरख्यापासून ते FGM पर्यंत सगळ्याचं समर्थन करता. मी स्पष्टपणे ब्रॅंडसना सांगतेय की दिवाळीच्या प्रॉडक्टसची जाहिरात करताना लक्षात ठेवा की दिवाळी हा एक हिंदू सण आहे. हिंदूंचे पैसे पाहिजेत ना, मग हिंदू परंपरांचा, हिंदू रितीरिवाजांचा सन्मान करायला शिका. आमच्या सणामध्ये भुंड्या कपाळाच्या बायका सुतकी चेहेऱ्याने वावरत नाहीत, मग जाहिरातीत तरी असं का असावं? नो बिंदी नो बिजनेस हा हॅशटॅग सुरु करताना स्पष्ट म्हटलं होतं की हा माझ्यापुरता निर्णय आहे. माझे कष्टाचे पैसे आहेत, ते कशावर खर्च करायचे ते मी ठरवणार. हॅशटॅग ट्रेंड झाला तो इतर खूप लोकांना माझ्यासारखंच वाटत होतं म्हणून. मी फक्त त्या खदखदीला वाट करून दिली. आतापर्यंत हा हॅशटॅग फक्त ट्विटर वर जवळजवळ सात लाख लोकांनी बघितलाय.

shefali vaidya photo
shefali vaidya photo

त्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी हे खरोखर मनावर घेतलं तर ब्रँडस ना झक्कत बदलावंच लागेल, आणि तिथेच तर वोक लिबटर्ड लोकांची वाट लागलेली आहे. कारण त्यांना हे स्पष्ट दिसतंय. माझ्यावर जितकी वैयक्तिक चिखलफेक होते आहे तितकाच हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतोय आणि तेच तर मला अभिप्रेत आहे. एक पैसाही प्रमोशन वर न खर्च करता माझा विचार आज फेसबुक आणि ट्विटर मिळून दहा लाख लोकांपर्यंत पोचलाय, तुम्ही बसा माझ्या नावाने बोटं मोडत आणि आक्रस्ताळा थयथयाट करत!” शेफाली वैद्य यांनी स्पष्ट शब्दात अगोदरच सांगितलं होतं की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे त्यांच्या समर्थनार्थ ‘हॅशटॅग नो बिंदी नो बिजनेस’ हा ट्रेंड आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनि त्यांच्या या मताला विरोध देखील दर्शवलेला पाहायला मिळतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here