अनेक कलाकार आपल्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काही न काही पोस्ट शेअर करत असतात. अशातच मराठी सिने विश्वातील बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल अभिनेत्री सई ताम्हणकर ही आपल्याला स्पेनची टूर करत असल्याची पाहायला मिळाली. यादरम्यानचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच सईने आज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनिष जोगसोबतची एक पोस्ट शेअर केली आहे. अनिषच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर करत तिने चहात्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सईने तिच्या खास व्यक्तीचे फोटो शेअर करत असं कॅप्शन लिहिलं आहे की,” हॅपी बर्थडे माय जेम, भरभरून जग, खुश रहा. तुझ्यासारखी माणसं आता या जगात जास्त पाहायला मिळत नाहीत. मला खूप आनंद होत आहे की, तू माझ्या आयुष्यामध्ये आहेस”. असं कॅप्शन लिहित सईने फोटो शेअर केले आहेत.

अनिष जोग हा एक एक्सप्लोरर आणि प्रोड्युसर आहे. त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला फार आवडतं. सोबतच तो वेगवेगळ्या वेबसिरीज देखील शूट करत असतो. त्याचबरोबर अनेक दिवस झाले सई त्याला डेट करत असल्याचं पाहायला मिळतय. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे कमी आणि सईचेच फोटो जास्त प्रमाणात दिसत आहेत. सईने पोस्ट केलेल्या या फोटोंना अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनिष जोगला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शुभेच्छांसह चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट करून चर्चेला विषय फोडला आहे. शुभेच्छांचा वर्षाव करत एका युजरने कमेंट केली आहे की,” दुसरा नवरा आहे का हा”. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे की,” क्युट कपल्स अँड क्युट व्हिडिओ”. त्याचबरोबर, ” नवा गडी नवा राज्य”, ” जोडा खूप छान आहे”. अशा कमेंट सईला आल्या असून अनिष सईचा नेमका कोण आहे असा प्रश्न चहात्यांना पडला आहे.