आज दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी विवाह बंधनात अडकले. अनेकांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. आज आणखीन एक कलाकाराची जोडही नुकतीच विवाह बंधनात अडकलेली आहे. माझा होशील ना या मालिकेतील प्रमुख अभिनेता आशय कुलकर्णी ह्याचा देखील निकटचा विवाह संपन्न झाला आहे. एक थी बेगम,पपाहिले ना मी तुला, किती सांगायचंय मला आणि माझा होशील ना अश्या अनेक मालिकेत अभिनेता आशय कुलकर्णी याने उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. झी मराठीवरील माझा होशील या मालिकेत तो प्रथमच व्हिलन म्हणून पाहायला मिळाला. त्याचा हा अभिनय हिरोपेक्षा देखील भारी असल्याचं अनेकांचं मत होत.

माझा होशील या या मालिकेतील त्याच्या अभिनयामुळे त्याला झी वाहिनेने पुन्हा एकदा चमकायची संधी दिली. पाहिले ना मी तुला ह्या मालिकेत त्याला प्रमुख भूमिका मिळालाय. आणि तो सुपरस्टार बनला. झी मराठीच्या टॉप सिरीयल मधील एका मालिकेचा तो प्रमुख कलाकार म्हणून प्रसिद्धीस आला. त्याने हि भूमिका देखील उत्तम साकारली. अनेक प्रेक्षकांनी त्याची वाहवाह देखील केली. झी मराठीच्या अनेक अवॉर्ड सोहळ्यात त्याला ह्या मालिकेसाठी काही पारितोषिके देखील मिळाली. इतकाच नाही तर त्याचा प्रमुख भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा भयपट १६ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. व्हिक्टोरिया हा भयपट दिग्दर्शन विराजस कुलकर्णी यांनी साकारला आहे. त्यात प्रमुख भूमिकेसाठी विराजसने अभिनेता आशय कुलकर्णी ह्याची निवड केली. सानिया गोडबोले हिच्यासोबत अभिनेता आशय कुलकर्णी याने लग्नगाठ बांधली आहे. काल दापोली येथे लाडघर बिच जवळील एका फार्म हाऊसमध्ये आशय आणि सानिया चा संगीत सोहळा पार पडला. यावेळ या दोघांनी वेगवेगळ्या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. अनेकांना हे माहित नसेल कि सानिया गोडबोले हि भरतनाट्यम विशारद असून अनेक दिवसांपासून त्याचे कलासेस देखील घेत आहे. सानिया ही अभिनेता सुव्रत जोशीची मावस बहीण आहे. असो अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..