२७ जुलै २०१७ रोजी मराठी रंगभूमी गाजवणारे जेष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं निधन झालं. मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. मधुकर मामा अशी ओळख असलेले मधुकर तोरडमल हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते. आपल्याला मधुकर मामांसोबत काम करता यावं असं अनेकांचं स्वप्न होत. एक उत्कृष्ट अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ते सर्व परिचित होते. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या नाटकाने वर्षनुवर्षं मराठी रंगभूमी गाजवली. तब्बल पाच हजारांहून अधिक प्रयोग झालेल्या या नाटकात त्यांनी स्वतः काम करत लेखन आणि दिग्दर्शन देखील केलं होत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी देखील मराठी चित्रपटात चांगल्या भूमिका करताना पाहायला मिळाली. त्यांच्या मुलीचं नाव अभिनेत्री “तृप्ती तोरडमल” असं आहे. पण सध्या तिच्या नावावरून वेगळीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

तुम्हाला ” मी शिवाजी राजे भोसले बोलतोय” हा चित्रपट आठवत असेलच. या चित्रपटात भोसल्यांची मुलगी ‘शशिकला भोसले’ हि हिंदी चित्रपटात काम मिळावं म्हणून आपल्या नावात बदल करून ते ” बी कला” असं ठेवते. मराठी नाव हे हिंदी चित्रपटासाठी डाऊन मार्केट आहे असा तो डायलॉग आजही सोशल मीडियावर गाजलेला पाहायला मिळतो. पण कोणी म्हणून गेलंय ना “नावात काय आहे?” पण खऱ्या आयुष्यात तस नाहीये. अनेक बॉलीवूड कलाकार आणि आता मराठी कलाकार देखील आपल्या नावातून आडनाव काढताना पाहायला मिळतात. अर्थात रसिका सुनील धबडगावकर, अमृता सुभाष ढेंबरे, सायली संजीव चांदसरकर, ललित प्रभाकर भदाणे अशी आडनाव असल्यामुळे ही कलाकार मंडळी नावापुढे वडिलांचे नाव लावतात. त्यांना त्यांच्या आडनावाने कोणच ओळखत नाही. पण ह्यापेक्षा खूपच वेगळं अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिच्या बाबतीत घडलेलं पाहायला मिळत आहे. तिने तृप्ती तोरडमल हे नाव हटवून चक्क “आयेशा मधुकर” असे नाव केल्याने तृप्ती हिंदी चित्रपटांसाठी स्वतःची वेगळी ओळख बनवताना दिसत आहे. “सविता दामोदर परांजपे” या चित्रपटातून तिने मराठी सृष्टीत पाऊल टाकलं होतं. फत्तेशीकस्त या चित्रपटात देखील तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तृप्ती तोरडमल पासून आयेशा मधुकर हे नाव का लावलं असा प्रश्न विचारला असता तिने अजब कारण दिल आहे. ‘माझ्या जन्मपत्रिकेत माझं नाव आयेशा आहे, जेव्हा सविता दामोदर परांजपे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यावेळी मला माझ्या नावात बदल करता आला नाही परंतु आता लवकरच माझा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात मी माझं नाव आयेशा लावण्याचा निर्णय घेतला आहे.’
