मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने बिगबॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये उत्तम खेळ केला. तिच्या खेळाडू वृत्तीने आणि बिगबॉसच्या घरात ज्या प्रकारे ती राहत होती त्यामुळे तिचे अनके चाहते झाले. बरीच वर्ष मराठी चित्रपट सृष्टीपासून दूर गेलेली तेजस्विनी बिगबॉसमुळे पुन्हा चर्चेत आली. अनेक चाहत्यांना तेनस्विनीच बिगबॉसची प्रमुख दावेदार वाटत होती. पण बिगबॉसच्या घरात खेळ खेळताना तिच्या उजव्या हाताला दुखापत झाली. दुखापतीमुळे तिच्या हाताला निळ्या रंगाचा कास्ट मटेरियल फफ्रॅक्चर स्लॅब लावला होता. दुखापतीनंतर जवळपास आठवडाभर ती बिगबॉसच्या घरात राहिली पण पुढे बिगबॉसचे खेळ खेळणं तिला अवघड जाणार होत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सक्तीची विश्रांती खूपच गरजेची होती आणि ह्याच कारणामुळे तिला बिगबॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं.

बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तेजस्विनी लोणारी हिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर लाईव्ह येऊन भेटायचं ठरवलं. चाहत्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मनातील भावना त्यांना व्यक्त करता याव्यात ह्यासाठी २ दिवसापूर्वी तिने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांशी संवाद साधला. ह्यावेळी अनेक प्रश्नांना तिने उत्तरे देत सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार देखील मानले. बिगबॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये जर मला पुन्हा जाण्याची संधी मिळाली तर मी नक्की जाईल आणि आधी ज्या उत्साहाने सगळे खेळ खेळले त्याच उत्साहात पुढेही खेळात राहील असं ती म्हणते. पुढे काय प्लॅन आहे असा प्रश्न विचारताच तिने एक घोषणा देखील केली. पुढे मी निर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पण ह्यावेळी एक अशी गोष्ठ चाहत्यांच्या निदर्शनास आली जी त्यांना अपेक्षित नव्हती नक्की काय झालाय हे त्यांना समजलं नसावं. तर झालं असं कि तेजसिनी लोणारी जेंव्हा बिगबॉसच्या घरात होती आणि जेंव्हा तिच्या हाताला दुखापत झाली तो तिचा उजवा आत निळ्या रंगाचा कास्ट मटेरियलने फफ्रॅक्चर स्लॅब लावलेला होता. त्याचे अनेक फोटो व्हायरल देखील झाले होते. पण जेंव्हा ती लाईव्ह आली तेंव्हा तिचा डाव्या हाताला दुखापत झाली असल्याचं दिसून आलं. तुम्हीही तो लाईव्ह विडिओ पाहिलात तर तुम्हालाही असच जाणवेल कि तिच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. अनेकांनी तिला नक्की कोणत्या हाताला दुखापत झालीय हे विचारलं. हा नक्की काय प्रकार आहे हे समजून घेऊयात..

टीव्हीवर उजव्या हाताला दुखापत झालेली दिसतेय आणि सोशल मीडियावर लाईव्ह येताना डाव्या हाताला दुखापत झालेली पाहायला मिळतेय असं का? ह्याच उत्तर अगदी सोपं आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्या उजव्या हातालाच दुखापत झालीय. टीव्हीवरील प्रेक्षकांनी पाहिलं ते अगदी बरोबर पाहिलं पण आपण जेव्हा मोबाईलवर लाईव्ह येतो त्यावेळी मोबाईलचा सेल्फी कॅमेरा सुरु असतो ज्यामुळे लाईव्ह येणाऱ्या व्यक्तीला समोरच्या व्यतीची चर्चा अथवा त्यांनी केलेली चॅटिंग वाचता येत. तेजस्विनीने देखील असच सेल्फी मोडमध्ये शूट केलं. सेल्फी मोड कॅमेऱ्यात डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी दिसते. सहज सहजी आपल्याला ते समजून येत नाही पण इथे हाताला दुखापत झालेली असल्यामुळे ते ठळकपणे निदर्शनास येते. तेजस्विनीच्या उजव्या हातालाच दुखापत झालीय पण कॅमेऱ्यामुळे ती डाव्या हाताला झाली असल्याचं भासते. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेल्फी घेताना उजवा हाताने पेन घेऊन लिहताना तो तुम्हाला डाव्या हातात पकडलेला निदर्शनास येईल एकदा करून पहा सर्व गोष्टींचा उलगडा होईल.