युवा किर्तन प्रबोधनकार ‘शिवलीला पाटील’ ही नेहमी आपल्याला कीर्तनामार्फत समाज प्रबोधन करताना पाहायला मिळते. तिचे ठिकठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम पार पडत असतात. अशातच शिवलीला आपल्याला गेल्या काही दिवसांत नऊवारी साडी नेसून पंढरीच्या वारीत तल्लीन झाल्याची देखील दिसली. परंतु सध्या भावभक्तीला पॉज करून शिवलीला एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. नुकताच तीने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

शिवलिला वारकरी संप्रदायाची सदस्य असल्यामुळे ती नेहमीच आपल्याला कीर्तनकारांच्या वेशामध्ये दिसते. पण सध्या डोक्याचा फेटा आणि कमरेचा शेला सोडून शिवलीला साजशृंगाराकडे वळलेली पाहायला मिळते. शिवलीलाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती सुंदर अशा पिवळ्या आणि लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. सोबतच तिने पिवळ्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घातल्या असून, कानामध्ये झुमके घातले आहेत. मोकळ्या केसांमध्ये शिवलीला फारच खुलून दिसत आहे. तिच्या या सोज्वळ सौंदर्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

व्हिडिओ शेअर करत शिवलीलाने असं कॅप्शन लिहिलं आहे की,” कधी सालस, कधी कणखर स्त्रीला माऊलीने दिलेल्या सर्व रंग रूपाचा आदर करता यावा हीच अपेक्षा”. असं सुंदर कॅप्शन शिवलीलाने या पोस्टला दिलं आहे. शिवलीलाच्या या पोस्टला तिच्या एका चाहतीने अशी कमेंट केली आहे की,” जरी तू एक कीर्तनकार असलीस वारकरी संप्रदायातील एक नावाजलेली प्रबोधनकार असलीस, तरी तुला तुझे वैयक्तिक आयुष्य तुझ्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे”. शिवलीलाचा हा अंदाज अनेकांना भावला असून, तिने स्वतःला आवडेल तस राहावं असं सर्वांना वाटत आहे.