उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांची जोडी सर्वांचीच आवडती जोडी असल्याचं दिसून येते. आज ६ ऑक्टोबर २०२१ साली ह्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली. १० वर्षांपूर्वी म्हणजेच ६ ऑक्टोबर २०११ ला ह्या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्याआधी ते एकमकांना तब्बल ६ वर्ष देत करत होते. प्रिया कॉलेजला असल्यापासून ती उमेशच्या प्रेमात होती असं तिने सांगितलं होत. त्यानंतर काही नाटकांत दोघांनी एकत्रित कामे देखील केली होती. प्रियाच्या वाढदिवशी तिने उमेशला प्रमोज केलं होत आणि काही दिवसातच उमेशने देखील होकार दर्शवला होता.

उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली असली तरी त्यांनी सिनेमा आणि मालिकांतून अनेक कामे केली आहेत. सोशिअल मीडियावर दोघेही सक्रिय असल्याचे दिसून येतात. अनेकदा फिरायला गेले असतानाचे एखाद्या कार्यक्रमाचे किंवा घरात एकत्रित स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळतात. आज त्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली असल्यामुळे प्रियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात उमेश आणि प्रिया उखाणे घेताना पाहायला मिळतात. उमेश उखाणा घेताना म्हणतो ” गाठी ती सुरेल, रूप तीच अलवार, प्रिया माझी रत्नजडित तलवार.. ” ह्यावर लोकांनी वाह वाह ची कौतुकास्पद दाद देखील दिली. त्यानंतर प्रियाने देखील उखाणा घेतलेला पाहायला मिळाला. पण उमेशने घेतलेला हा हटके उखाणा सर्वांच्याच पसंतीस उतरला आणि मंडपात सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमठल. अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट कामत ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..