देवमाणूस मालिका आता नव्या वळणावर आलेली पाहायला मिळतेय चंदा डॉक्टरकडून तिचे पैसे घ्यायला सुरू आजीच्या वाड्यात राहायला लागलीय. ह्यामुळे तिला डॉक्टवर पळत ठेवता येतेय. डॉक्टरकडे वारंवार ती पैश्याची मागणी करते तो पैसे द्यायला उशीर करतो म्हणून चंदा त्याची चांगलीच पिळवणूक करताना पाहायला मिळते. देवमाणूस मालिका निरोप घेण्याच्या उंबरठयावर असल्याची चर्चा आहे पण आता मालिकेत एका नवीन अभिनेत्रीचा चेहरा झळकताना पाहायला मिळतोय त्यामुळे मालिका अजून चालणार हे नक्की. चला तर पाहुयात हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण ….

आजच्या भागापासून मालिकेत आता नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. ती डॉक्टरकडे चेकपसाठी आली आहे डॉक्टरचा व्हिडिओ टीव्हीवर पाहून ती इथवर आल्याचं तिने सांगितलेले आहे . पण हि नवी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तुम्ही ह्या अभिनेत्रीला ह्या पूर्वी देखील पाहिलंय. होय हि अभिनेत्री आहे “संजना काळे”. संजना हि ऍक्टर, डान्सर, कॉरोग्राफर म्हणून ओळखली जाते. संजना काळे कलर्स मराठीवरील “बाळुमामाच्या नावानं चांग भलं”, फक्त मराठी वरील “सप्तपदी” ह्या मालिकांत काम केले आहे. याशिवाय तिने गेट टू गेदर ह्या चित्रपटात हि महत्वाची भूमिका बजावली आहे. देवमाणूस मालिकेमुळे तिला आता नवी ओळख आणि प्रसिद्धी मिळणार हे नक्की. ह्या आधीही अनेक अभिनेत्रींना देवमाणूस मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मालिका इतक्यात संपणार नसल्याचं अभिनेता किरण गायकवाड ह्याने नुकतंच लाईव्ह येऊन सांगितलं होत. आता ह्या अभिनेत्रींच्या येण्याने मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण होणार हे नक्की. मालिका अजून बरेच दिवस चालणार अस चित्र तरी निर्माण होताना पाहायला मिळतेय.