‘व्हीक्स कफ ड्रॉप्स’ ची ही ऍड १९८२ साली दूरदर्शनवर प्रसारित होत होती. त्यावेळी ही ऍड सर्वांच्याच विशेष परिचयाची बनली होती. ऍडमधील ही चिमुरडी आज मराठी तसेच हिंदी सृष्टीतील एक परिचयाचा चेहरा म्हणून ओळखला जात आहे. वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षी ही ऍड साकारणारी चिमुरडी आहे ईशीता अरुण. तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात… शाळेत शिकत असतानाच ईशिताने नादिरा बब्बर यांच्या ऍक्टिंग वर्कशॉप मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. सें. क्झेविअर्स कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. श्याम बेनेगल यांच्या यात्रा मालिकेतून तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती. ईशीता अरुण ही बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका ईला अरुण यांची कन्या आहे.

२००२ साली वैशाली सामंत हिने गायलेले ‘ऐका दाजीबा’ हे गाणे खूप हिट ठरले होते. या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि ईशिता अरुण हे कलाकार झळकले होते. ईशीताला या गाण्यामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या एका गाण्यामुळे हिट मिळालेली ईशीता सोनू निगमच्या मौसम या अल्बममधूनही झळकली होती. सारेगमप (एक मै..) सारख्या शोचे तिने सूत्रसंचालन देखील केले होते. २००५ साली ईशिता ध्रुव घाणेकर सोबत विवाहबंधनात अडकली. ध्रुव घाणेकर हा बॉलिवूड गायक आहे शिवाय शास्त्रीय आणि जॅझ फॉर्म मध्येही अनेक स्टेजवर तो परफॉर्मन्स करतो. ध्रुव घाणेकर हा दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. गिरीश घाणेकर यांनी वाजवा रे वाजवा, रंगत संगत, नवसाचं पोर यासारखे अनेक मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ९० च्या दशकातील त्यांची ‘गोट्या’ ही मालिका देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. गिरीश यांचा धाकटा मुलगा जॉय घाणेकर याला त्यांनी गोट्या या लोकप्रिय मालिकेतून गोट्याची प्रमुख भूमिका साकारण्यास दिली होती. आज हा गोट्या म्हणजेच जॉय घाणेकर सॅन फ्रान्सिस्कोला स्थायिक असून अभिनयापासून दूर गेलेला पाहायला मिळतो. तेथील Talech या कंपनीचा तो प्रॉडक्ट हेड म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात परदेशात असलेल्या जॉयने अनेक वर्षानंतर आपल्या भावाची भेट घेतली होती. त्याचे फोटो ध्रुव घाणेकर यांनी फेसबुकवर शेअर केले होते.