Home News दुबईतल्या राजमहालावर सोनाली कुलकर्णीची भन्नाट प्रतिक्रिया

दुबईतल्या राजमहालावर सोनाली कुलकर्णीची भन्नाट प्रतिक्रिया

1476
0
sonalee kulkarni actress
sonalee kulkarni actress

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे छोटीशी गोष्ट वाढवून चढवून रंगवलेली पाहायला मिळते. मग एखाद्या कलाकाराचे घर असो वा प्रॉपर्टी ती अगदी राजमहालासारखीच आहे असे कित्येकदा भासवण्यात येते. बऱ्याचदा बॉलिवूड सेलिब्रिटीच्या बाबतीत असेच रंजक किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यांची घरं देखील दुसऱ्याच कुठल्या घरांच्या फोटोनी सजलेली पाहायला मिळतील. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नसते उगाचच नेटवरून आलिशान घरांचे फोटो घ्यायचे आणि ते सेलिब्रिटीच्या नावाने खपवायचे. असेच रंगवलेले किस्से तुम्हाला युट्युबवर पाहायला मिळतील. नुकतेच मराठी सृष्टीतील दिवंगत अभिनेते ‘किशोर नांदलस्कर ‘ यांच्या बाबतही असेच किस्से रंगवले गेले की, त्यांच्याकडे आलिशान बंगले आहेत, चार चाकी गाड्या आहेत वगैरे वगैरे…

sonalee kulkarni bhannat reply

मात्र प्रत्यक्षात हा कलाकार एके काळी घरात जागा कमी असल्याने मंदिरात जाऊन झोपायचा त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मिळवून दिले होते. त्यामुळे अशा रंगवलेल्या किस्यांमध्ये किती तथ्य आहे ते आपण जाणणे गरजेचे आहे. आज असाच एक किस्सा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या बाबतीत घडला आहे. त्यावर स्वतः सोनालीने एक भन्नाट प्रतिक्रिया देखील दिली आहे . ही प्रतिक्रिया वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही…अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच विवाहबद्ध झाली. सध्या ती तिचा पती कुणालसोबत दुबईमध्ये राहत आहे. परंतु मीडियाच्या माध्यमातून तिच्या घराबाबत खूप काही रंगवून सांगण्यात आलेले पाहायला मिळते आहे. नुकतेच सोनालीने त्या बातमीवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. सोनाली दुबईत आहे आणि ती ज्या घरात राहते ते घर राजमहालापेक्षा कमी नाही असे सांगून वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या घराचे (राजमहालाचे) फोटो व्हायरल केले आहेत. लग्नानंतर सोनाली तिच्या पतीसह राजमहालात राहते असे भासवून या बातमीदाराने एक चूक केली असल्याचे सोनाली ने निदर्शनास आणून दिले आहे. ही बातमी पाहून ती म्हणते की, “राजमहाल….आम्हीच पाहिला नाहीये अजून….काय हे…काहीही सांगता राव…आमचा 2BHK flat आहे, हो पण आम्ही सुखी , निरोगी आणि समाधानी आहोत, त्यामुळे आमच्यासाठी हाच आमचा महाल” सोनालीने दिलेली ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्यामुळे या बातमीत किती तथ्य आहे हे तिच्याकडूनच स्पष्ट झाले आहे. तिच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी हास्याचा पाऊस पाडला आहे. मुळात तथ्य जाणून न घेताच भलत्याच गोष्टी रंगवून लोकांना आकर्षित करणे हे आता नित्याचेच झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here