Home News एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांत लग्न असं केलं सोनालीने कुणाल सोबत...

एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांत लग्न असं केलं सोनालीने कुणाल सोबत लग्न

3768
0
actress sonalee kulkarni wedding
actress sonalee kulkarni wedding

आज १८ मे मराठी सृष्टीतील देखणी आणि तितकीच दिलखुलास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिने नुकतीच लग्न झाल्याची घोषणा केली आहे. “अब हम 7 ‘मे’ असे कॅप्शन देऊन तीने कुणाल सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनालीच्या भांगेतील कुंकू देखील अगदी स्पष्ट दिसत आहे. तिच्या या कॅप्शन वरून ती ७ मे रोजी विवाहबद्ध झाली असल्याचे समोर आले आहे. सोनालिनी हा खुलासा करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तिच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांसह मराठी सृष्टीतील अनेक नावाजलेल्या कलाकारांना देखील आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

sonalee kulkarni wedding photos

खरं तर सोनालीने दिलेला हा सुखद धक्का तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्यकारक वाटणारा आहे हे तिने पहिल्यांदाच केले नाही तर गेल्या वर्षी देखील तिने २ -२-२०२० रोजी गुपचूप साखरपुडा केला होता पण वाढदिवसाच्याच दिवशी तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. फेब्रुवारी महिन्यात कुणाल सोबत झालेल्या साखरपुड्याचे फोटो तिने मे महिन्यात शेअर केले होते.साखरपुड्याविषयी तिनं सांगितलं, की ‘कुणाल हे कामानिमित्त दुबईमध्ये वास्तव्यास आहेत आणि आई-बाबा लंडनमध्ये राहतात. मी आणि माझं कुटुंब भारतात असल्यामुळे आम्ही साखरपुड्यासाठी सर्वांसाठी सोयीस्कर अशी एक मधली जागा ठरवत दुबईमध्ये घरातल्या घरात छोटेखानी कार्यक्रम केला. आधीपासूनच ०२-०२-२०२० ही तारीख आमच्या डोळ्यांसमोर होतीच. जी सरळ किंवा उलटी वाचली, तरी सारखीच असते. ‘पहिल्यांदा तुम्ही कुठे भेटलात आणि नेमकं कुणी कोणाला मागणी घातली?’ असं विचारल्यावर सोनाली म्हणाली, की ‘मी ‘ती अँड ती’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेले होते. तिकडे आमच्या कुटुंबाच्या स्नेहींच्या ओळखीनं पहिल्यांदा कुणाल यांच्याशी माझी पहिली भेट झाली होती. त्यांनीच मला लग्नाची मागणी घातली.’ अस तीन त्यावेळी सांगितलं होतं. मात्र लग्नाच्या बाबतीतही तीने खुलासा केला की तिने लग्न कुठे केलं आणि कस ? लग्नाचे फोटोदेखील तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत .

actress sonalee kulkarni wedding photo

या फोटोसोबत लग्नाबाबत ती म्हणते की, So, आम्ही June मध्ये uk ला लग्न करणार होतो Uk च्या second wave मुळे तारीख पुढे करावी लागली, मग venue च्या availability अनुसार July मधली तारीख ठरली. लग्नाच्या तयारीसाठी मी March मध्ये shooting संपवून Dubai ला आले,आणि भारतात second wave आली Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही! April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला. July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून..Quarantine, travel restrictions, family साठी असणारी risk, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकार चे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ cancel करायचा निर्णय घेतला.June चं July होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी July चं May मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणाल चे लंडन ला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही…आताच शिक्का मोरतब करून टाकू. २ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ mins मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात, वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून ( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) Marriage Certificate वर sign केलं. इथे सगळ्या process आणि paperwork मध्ये आम्हाला मदत करणारे Rahul Tulpule Deepali Tulpule यांचे आभारआमचे foster parents Sachin Narhar Joshi Shriya Joshi आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या Madhavi Amdekar Kolumbus International Marriage Bureau for professionals चे ही मनापासून आभार पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल, तेव्हा, तिथे, तसं, family & friends बरोबर सगळ्या विधीनिशी आमची dream wedding करूच.तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या …” ​सोनाली कुलकर्णी आणि कुणाल यांना वैवाहिक जीवनाच्या भरघोस शुभेच्छा!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here