काल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ‘७ मे’ रोजीच लग्न झाल्याची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तिच्या या बातमीने आताही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील सोनालीने आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी साखरपुडा केला असल्याचे सांगून चाहत्यांना असाच सुखद धक्का दिला होता. २ फेब्रुवारी २०२० तारीख उलट सुलट वाचली तरी सारखीच त्यामुळे याच दिवशी तिने कुणालसोबत साखरपुडा करण्याचे निश्चित केले होते. सोनाली आणि कुणालची लव्हस्टोरी केव्हा सुरू झाली याची उत्कंठा सर्वांनाच होती. ती पहिल्यांदा कुणालला कधी भेटली? आणि कोणी अगोदर प्रपोज केले याबाबत स्वतः सोनालीनेच खुलासा केला आहे.

२०१९ सालच्या ‘ती अँड ती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सोनाली लंडनला गेली होती. तिकडे तिच्या कुटुंबाच्या स्नेहींच्या ओळखीनं पहिल्यांदा कुणाल यांच्याशी तिची पहिली भेट झाली होती. सोनाली अभिनेत्री आहे असे कुणालला अगोदरच माहीत होते. फक्त एक औपचारिकता म्हणून पाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला. कुणालला सोनाली पसंत होतीच त्यामुळे पहिल्यांदा कुणालनेच तिला प्रपोज करून लग्नाची मागणी घातली. कुणालच्या मागणीवर सोनालीनेही आपला होकार लगेचच कळवळा. सध्या सोनाली आणि कुणालचे लग्न सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. सोनालीचे आई वडील भारतात तर कुणालचे कुटुंब लंडनला मात्र दुबईत असलेल्या कुणाल आणि सोनालीने आई बाबांची परवानगी घेऊन अवघ्या दोन दिवसात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यात महत्वाची बाब म्हणजे यावेळी परिस्थितीचे गांभीर्य पाहून कुठलाही मोठा सोहळा करण्याचे त्यांनी टाळले आणि एका तासात लग्नाची खरेदी करून १५ मिनिटात मंदिरात जाऊन रजिस्टर पद्धतीने लग्न केले. लग्नाचा होणारा अवास्तव खर्च त्यांनी महा’मारी मदत निधी म्हणून देणार असल्याचे जाहीर केले. यावरून दोघांचे कौतुक देखील होत आहे. लग्नाचे सर्व विधी आता पार पाडता नसले आले तरी येत्या काही दिवसांमध्ये सर्व सुरळीत झाल्यावर विधिवत पुन्हा एकदा लग्नाचा सोहळा सोनालीला अनुभवायचा आहे त्यावेळी सर्व मित्रमंडळींना आमंत्रित केले जाईल असे सोनाली तिच्या पोस्टमध्ये म्हटली आहे.