संजय झनकर निर्मित झी टीव्ही वर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होणारी “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. शहरात वाढलेली एक श्रीमंत मुलगी आणि गावात वाढलेला रांगडा मुलगा जो शहरात शिक्षणासाठी गेला आणि आता शहरातच काम देखील करतो ह्या दोघांची प्रेम कहाणी आणि त्यांना येणाऱ्या समस्या ह्याची हि कहाणी.. मालिकेतील सर्वच पात्रे खास आहेत पण आज आपण मालिकेतील सिद्धार्थच्या काकांच्या ( अभिनेते निवास मोरे) खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका पोस्टद्वारे हि माहित दिली त्यात ते म्हणतात…

अभिनेते निवास मोरे म्हणतात “मी रुंगठा हायस्कूल चा विद्यार्थी. शाळेत असताना मला अभ्यासात अजिबात गोडी नव्हती. नेहमी चाचणी परीक्षेला दोन तीन विषयात मी हमखास नापास व्हायचो, वार्षिक परीक्षेत ग्रेस मार्क देऊन वरच्या वर्गात घातले आहे हा शेरा, लाल शाईने दर वर्षी असायचा. साधा निबंध मला पाठ होत नसायचा व लिहिता येत नव्हता तो पण मराठी विषय पण खेळ व नाटक म्हटले की एका पायावर तयार अभ्यासात कधी बक्षिसे मिळवले नाही. पण शालेय नाट्य स्पर्धा पुरोहित एकांकिका स्पर्धत मात्र आयुष्यात प्रथम मला बक्षीस अभिनयाचे मिळाले. ज्या मुलाला शाळेत निबंध लिहिता येत नव्हता, त्याचे नाटकाचे डॉयलॉग हमखास पाठ व्हायचे आहे की नाही गंमत कधी निबंध लिहिता आला नाही. पण नंतर लेखन जमायला लागले सिनेमाचे लेखन ,संवाद लिहायला लागलो, अभ्यासाचा कंटाळा तिथे पुढे वाचनाची गोडी लागली कधी शाळेतील शिक्षकांनी दखल घेतली नाही. तिथे देश पातळीवर,,दिल्ली येथे सत्कार झाला तो कावळा सिनेमाचे लेखन दिग्दर्शक म्हणून राज्य लेव्हल ला कोल्हापूर येथे सत्कार लोकांनी दिलेला पब्लिक डिमांड पुरस्कार मी कधीच विसरणार नाही. धन्यवाद कोल्हापूर, आयुष्यात हा काही करेल का ही नेहमी वडिलांना चिंता पण स्वतःच्या हिमतींवर बांधकाम क्षेत्रात उतरून यशस्वी झालो.

गव्हर्नमेंट चा ठेकेदार झालो, पाण्याचे टँकर व्यवसाय केला. वाळू व्यवसाय केला. हॉटेल व्यवसाय वाढवला, नाशिक वडापाव हा ब्रँड नाशिक मध्ये यशस्वी केला. आज स्वकष्टाने जे जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आणि आज ही स्वप्न बघणे सुरूच आहे ,स्वप्न बघितलेच पाहिजे आणि तो पूर्ण करण्याचा ध्यास घेतला पाहिजे रोज चार पाच मोठी स्वप्न बघा. नक्कीच दोन पूर्ण झाल्यावर इतर तीन स्वप्न पूर्ण होतील आज प्रामाणिक कष्ट करून जिद्धी ने वयाच्या 50 व्या वर्षी कल्याणी लोणच्याचा व्यवसाय सुरू केला आहे खुप कष्ट आहे पण आनंद खुप मिळतोय या कामात बघू या कष्टाला फळ मिळते का सांगण्याचे तात्पर्य इतकेच आज च्या पालकांनी मुलांकडून खुप अपेक्षा ठेऊ नका नाही अभ्यासात मन लागत तर त्याच्या आवडीच्या कामात त्याला करियर करु द्या पण तुमचे विचार लादू नका. तुमचा मुलगा मुलगी नक्की यशस्वी होतील फक्त त्यांची संगत सोबत कोणाबरोबर आहे हे लक्ष ठेवा आज माझ्या बरोबरची डबल डिग्री वाले कमवत नाही त्यांच्या पेक्षा जास्त मी प्रामाणिक कष्ट करून कमावतो. पण जीवनात शॉट कट नाही, कष्टाशिवाय यश नाही हे तितकेच खरं” .. आपला निवास मोरे.