कीर्तनकार शिवलीला पाटील हिच्या बिगबॉस मध्ये जाण्याने अनेकांनी आक्षेप घेतला होता त्यामुळेच आजारपणाच कारण सांगून शिवलेला पाटील खेळातून बाहेर पडल्या असल्याचं बोललं जात होत. आता नुकतीच तिचा एक व्हिडिओ पाहायला मिळतोय त्यात ती बिगसॉसच्या टीमला संदेश देताना पाहायला मिळतेय. महेश मांजरेकरांनी ह्यावेळी चावडीवर अनेकांची शाळा घेतली खडेबोल सुनावले मग नंतर हा शिवलीलाच व्हिडिओ दाखवण्यात आला त्यावेळी सर्वाना अश्रू अनावर झाले. मागच्या वेळी प्रकृतीच्या कारणामुळे घराबाहेर आलेली सदस्य शिवलीला पाटील नक्की काय बोली ह्याची उत्सुकता सर्वाना लागून असेल . त्या व्हिडिओची सुरवात करताना तिने रामकृष्णहरी म्हणत सुरवात केली. त्यात ती नक्की काय म्हणाली ते सविस्तर पाहुयात..

कीर्तनकार शिवलीला पाटील हिच्या बिगबॉसच्या सहभागावर अनेकांनी आक्षेप घेतला तर काहीजणांनी तिला तिला सपोर्ट देखील केला होता. एका महिलेला तिच्या इच्छेनुसार वागण्याचा पूर्ण अधिकार आहे मग ती कीर्तनकार का असेना असं मत अनेकांनी मंडळ होत. कीर्तनकार शिवलीला पाटील हिने आता नुकताच एक व्हिडिओ मध्ये ह्याचा उलडगड करत पूर्णविराम दिला आहे त्यात त्या म्हणाल्या ” रामकृष्णहरी, मी सर्वांची लाडकी कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील मी बिगबॉस सीजन ३ ह्या मराठी कार्यक्रमात सहभागी झाले होते. माझी तब्बेत अचानक खराब झाली होती त्यानंतर बिगबॉसच्या घरामध्येदेखील ३-४ टेस्ट झाल्या होत्या. टॅबलेट घेतल्या, गोळ्या घेतल्या, औषधे घेतली ट्रीटमेंट देखील घेतली परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता. आराम करून देखील काहीच फायदा झाला नाही त्यामुळे मी हॉस्पिटलला शिफ्ट झाले. तेंव्हापासून आत्तापर्यंत माझी ट्रीटमेंट चालू आहे. अजूनही विकनेस आहेच. त्यामुळे मी स्वतःहून बिगबॉसमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. कारण माझं शरीर मला साथ देत नाहीयेत्यामुळे मला नाही वाटत कि मी आता तेथे भाग घेऊ शकेन. त्यामुळे बाहेर येन हा माझा स्वतःचा निर्णय आहे. मी स्वतःच्या मतावर ठाम आहे. मी स्वतःच्या मर्जीने ह्या शो मधून बाहेर येत आहे. मला महेश सरांची माफी मागायची आहे मी त्यांना सांगितलं होत कि मी नक्की सहभागी होतील पण आता ते शक्य वाटत नाही. सर्वानी माझी काळजी घेतली. विशेष म्हणजे विशाल दादा, मीनल सोनाली, सुरेख ताई ह्या सर्वांशी माझं चांगलं बॉण्डिंग झालं. मला तुमच्या सोबत राहायची इच्छा होती.” असं म्हणत शिवलीलाने ह्या सर्व गोष्टीला पूर्णविराम दिला आहे.