प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे दिसून येतेय. पपुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२१ ला ती लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते. डिसेंबरच्या १२, १३ आणि १४ तारखेला ती लग्नगाठ बांधणार असल्याचं पुढे येतेय. ३ दिवस चालणार हा लग्नसोहळा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणार आहे. हिंदी टीव्ही मालिकांतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे हिला ओळखलं जात. पण तिचा होणारा पती नक्की आहे तरी कोण असा सवाल तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात…

अभिनेत्री अंकिता लोखंडे हि तिचा बॉयफ्रेड विकी जैन सोबत लग्नगाठ बांधणार आहे. विकी जैन हा कोणी अभिनेता किंवा प्रोड्युसर नाही खरतर त्याचा ह्या इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. विकी जैन हा मोठा बिजनेसमन आहे. अनेक उद्योगांचा मालक विकी जैन आणि अंकिता यांची एका पार्टीमध्ये ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन आता ते लग्न करणार आहेत. विकी जैन आधी अंकिता हि मालिकेतील कलाकार सुशांत राजपूत ह्याच्याशी रिलेशनशिपमध्ये होती पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. पवित्र रिश्ता ह्या मालिकेतून दोघांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. नंतर दोघांच्याही खऱ्याखुऱ्या लग्नाच्या अनेक चर्चाना उधाण आलं होत. पण त्यांनतर दोघांचं ब्रेकअप झालं. आता ह्याच मालिकेचा सेकंड पार्ट पवित्र रिश्ता २ देखील सुरु आहे पूर्वी प्रमाणेच आताही मालिकेचे चाहते मालिकेला भरभरून साथ देताना पाहायला मिळतात. आता अंकिताच्या लग्नाच्या बातमीने अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत आलेली पाहायला मिळते. खरतर ह्यांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासूनच रंगत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. नुकताच अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अंकिता लोखंडे आणि विक्की जैन भर पार्टीत एकमेकांना किस करताना दिसून असल्याचं तो व्हिडिओ पाहूनच ह्यांच्या लग्नाच्या चर्चेला सुरवात झाली होती. ह्या पूर्वी देखील अनेक पार्टी मध्ये दोघांना एकत्र पाहिल्याचे अनेक फोटो लोकांनी शेअर केले होते. त्यांनतर दोघांनी देखील सोशिअल मीडियावर एकमेकांनसोबतचे फोटो अपलोड करून रिलेशनशिप मध्ये असल्याचे सांगितले. सध्या आणखीन एक बॉलीवूड कलाकारांच्या लग्नाची बातमी रंगताना पाहायला मिळतेय ती म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची पण त्यात किती सत्यता आहे हे येत्या काही दिवसात उघड होईलच.