सामान्य माणसाप्रमाणेच कलाकारांना देखील भारतातील विविध भाषा जाणून घ्यायला नक्कीच आवडते अर्थात त्या सर्वांची कारणे वेगवेगळी असू शकतात परंतु कलाकारांना विविध भाषा ज्ञात झाल्या की इतर भाषिक मालिका किंवा चित्रपटातून त्यांना अभिनयाची संधी मिळतेच. मराठी सृष्टीतील जुन्या नव्या पिढीतील बऱ्याचशा कलाकारांनी हा अनुभव घेतलाही आहे. यात वर्षा उसगावकर, अर्चना जोगळेकर, श्रुती मराठे, सोनाली कुलकर्णी यांचीही नावं या पठडीत आवर्जून घ्यावी लागतील. अगदी दाक्षिणात्य, असामी सारख्या चित्रपटातून या कालाकारांना काम करायची संधी मिळाली होती. याच अनुषंगाने अभिनेता आस्ताद काळे यालाही भारतातील विविध भाषा शिकण्याची प्रामाणिक ईच्छा आहे. मागील काही दिवसांपूर्वी आस्तादने माझ्याकडे काम नसल्याची एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर कलर्स मराठी वरील ” चंद्र आहे साक्षीला” मालिकेत त्याला संग्रामची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

परंतु आता १७ एप्रिल रोजीच ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यामुळे आस्तादकडे काम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कारणास्तव तो विविध भाषा जाणून घेऊन अशा मालिका किंवा चित्रपटातून कामे मिळावित म्हणून तशा प्रयत्नात आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे यात तो काय म्हणतो ते पाहुयात…
“पंजाबी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषा (अगदी प्राथमिक प्रमाणात) कुठे शिकता येतील? …यापैकी एका industryमधे प्रयत्न करावे म्हणतो…..” त्याच्या या पोस्टवर अनेकांनी दिलखुलास मते मांडली आहेत तर त्यावर अनेकांनी उपाययोजना देखील सुचवल्या आहेत तर काहींनी चांगले मार्गदशन देखील केलेले पाहायला मिळते आहे. अर्थात त्याने केलेली ही पोस्ट प्रामाणिकपणे केली असल्याने त्याला चाहत्यांकडून तसेच मित्रमंडळीकडूनही उत्तम असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आपण करत असलेले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास त्याला यश नक्कीच मिळते आस्ताद ची ही ईच्छा देखील पूर्ण व्हावी अशी आमचीही मनोमन ईच्छा आहे त्याला या बाबतीत निश्चित असे यश लाभो हीच सदिच्छा.