आजकाल कुठली फॅशन ट्रेंड मध्ये येईल हे सांगणे कठीण आहे. मात्र अशा ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशन्स सामान्य व्यक्तींप्रमाणे कलाविश्वात देखील लोकप्रिय असलेल्या पाहायला मिळतात. मराठमोळा सिद्धार्थ जाधव यांची फॅशनसेन्स बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ह्याच्याशी मिळती जुळती असल्याचा प्रत्यय अनेकदा आला म्हणून सिद्धार्थला मराठीतला रणवीर सिंग म्हणूनही नाव पडले आहे. अशी फॅशन अभिनेता अभिजित खांडकेकर देखील कित्येकदा करताना दिसतो. मध्यंतरी त्याने असाच एक रंगीबेरंगी शर्ट घालून त्याखाली भली मोठी बॉटम असलेली पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या या फोटोवर कित्येकांनी भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या होत्या.

फॅशनच्या बाबतीत पुढे असलेला अभिजित आता चक्क एक फटका टीशर्ट घालून प्रेक्षकांसमोर आला. “कशी नशिबानं थट्टा आज मांडली version 2.0 होय टी शर्ट असाच आहे ….” असे कॅप्शन देऊन त्याने हा फोटो शेअर केला आहे. त्यावर एकाने त्याला धारेवर धरत ट्रोल करणारी कमेंट केली ती कमेंट अशी होती….”ते फाटकी पँट आली मार्केट मध्ये तसेच टिशर्ट पण आले का ?? पण मग मी काय म्हणतोय हे फाटके कपडे हजारो रूपये देऊन विकत घ्यायचे आणि स्टाईल किंवा नविन फॅशन म्हणून घालायचे हे काही योग्य नाही वाटत, पुढचं बोलायचं होतं पण सोशल मिडीयाचा आदर म्हणून नाही बोलत, समजून घ्यावे…” “एखाद्या नविन रोल साठी असेल तर हरकत नाही, पण स्टाईल म्हणून नको हे असलं, काय आहे ना तुमच्या सारख्या सेलिब्रेटिजना असंख्य फॅन फाॅलो करतात, ऊद्या जर सगळे फाटके कपडे विकायला लागले स्टाईल म्हणून तर अवघड होईल.”. अशा कमेंटची अभिजितने दखल घेऊन भन्नाट प्रतिक्रिया देखील दिली आहे अभिजित आपल्या प्रतिक्रियेत म्हणतो की,…” सगळेच कुबेर नसतात हो…. तुम्हीही समजून घ्या” … अभिजीतच्या या मजेशीर प्रतिक्रियेला अनेकांनी लाईक देखील केले आहे आणि त्या चाहत्याला तुमचे मत अगदी योग्यच आहे असे म्हणून त्यांचे आभार देखील मानले आहेत.
