नवा गडी नवं राज्य हि मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील आनंदी प्रेक्षकांची मने जिंकताना पाहायला मिळत आहे. गोड सोज्वळ स्वभावाची आनंदी राघवच्या आयुष्यात आली अन त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना ती दिसते. मालिकेत पल्लवी पाटील हिने आनंदी साकारली आहे तर राघव कश्यप परुळेकर ह्या अभिनेत्याने साकारला. या दोघांच्या व्यतिरिक्त अनिता दाते, वर्षा दांदळे , साइशा भोईर आणि कीर्ती पेंढारकर या कलाकारांनी अभिनय केला आहे. वर्षा आणि तिची आई या मायलेकींची जोडी मालिकेत सर्वांची तारांबळ उडवताना पाहायला मिळतात. पण वर्षाचा पती तिच्याशी खूपच अत्याचार करताना पाहायला मिळतो.

वेळोवेळी तिच्यावर ओरडत छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला मारताना खोलीत डांबताना पाहायला मिळतो. आता वर्षाच्या घरातली तिची सत्य परिस्थिती आनंदीला समजलेली असते. त्यामुळे आनंदी आता वर्षाला मदत करताना होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवताना पाहायला मिळणार आहे. मालिकेत वर्षा हे पात्र अभिनेत्री “कीर्ती मेहेंदळे – पेंढारकर” हिने साकारलं आहे. “चोरीचा मामला” या चित्रपटात अभिनेत्री कीर्ती पेंढारकर झळकली होती. यानंतर सोनी मराठी वाहिनीवर आठशे खिडक्या नऊशे दारं हि मालिका देखील तिने साकारली. कीर्ती मेहेंदळे हीच पती आकाश पेंढारकर हा देखील याच क्षेत्रात कार्यरत आहे. दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, व्हिडीओ एडिटर आणि मीडिया मध्यमातून तो कार्यरत आहे. “आपडी थापडी” या चित्रपटाच्या मार्केटिंगची कीर्ती आणि आकाश पेंढारकर या दोघांनी मिळून केली होती. चोरीचा मामला, मंकी बात, चंद्रमुखी या चित्रपटांसाठी त्याने काम केले आहे. कीर्ती मेहेंदळे- पेंढारकर आणि पती आकाश पेंढारकर या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.