काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप एकमेकांपासून विभक्त होत असल्याच्या अनेक बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अभिनेत्री मानसी नाईक हिने ह्यावर प्रतिक्रिया देत आम्ही खरोखरचं विभक्त होत असून त्याची प्रक्रिया देखील चालू असल्याचं म्हटलं होत. महामारीच्या काळात आम्ही जवळपास २ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहत होतो त्यानंतर आम्ही लग्न केलं असं तिने सांगितलं होत. तेव्हा सगळेच एकमेकांशी चांगले वागत होते, असं मानसी म्हणाली. यापूर्वी मानसीने प्रदीप वर केलेल्या आरोपांमध्ये असं म्हटलं होतं की प्रदीप ने केवळ माझ्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी करिता लग्न केलं आहे जोपर्यंत माझ्याकडून त्याला पैसा मिळत होता तोपर्यंत तो चांगला वागत होता.

माझ्या प्रसिद्धीचाही त्याने स्वतःसाठी वापर करून घेतला. मात्र आता त्याचं वागणं पूर्णपणे बदललं असून त्याच्यासोबत राहणं शक्य नसल्याचं तिने सांगितलं होत. तिच्या ह्या म्हणण्यावर पती प्रदीपने देखील मौन सोडलं होत. मी खरा आहे त्यामुळं शत्रूंची भीती वाटतं नाही’, असं त्यानं म्हटलं आहे. तर आणखी एका फोटोवर त्यानं म्हटलं आहे की, दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊ नका, कारण कधी कधी मीठ देखील साखरेसारखं दिसतं’, “मै बेवफाई करके नही बेवफाई सेहके बेठा हू” असं प्रदीपनं म्हटलं आहे. आता बरीच दिवस मानसी आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपट सृष्टीत तिने पदार्पण केलं आहे. नुकत्याच झालेल्या चला हवा येउद्या च्या मंचावर देखील तिने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आता सर्व काही विसरून मला पुन्हा काम करायचंय मोठं व्हायचंय पुन्हा ते चांगले दिवस माझ्या आयुष्यात यावेत यासाठी ती प्रयत्न करताना पाहायला मिळतेय. तर तिकडे पती प्रदीप खरेरा हा देखील आपल्या पुढील बॉक्सिन्गच्या तयारीला लागेलला दिसला. पण आज त्याने पुन्हा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर केला त्यात “देदी राही तुझ्या मैने मेरे ख्वाब से तेरे मेरे रास्ते जुदा है आज से” असं म्हटलं आहे.

तर एका व्हिडिओमध्ये “आँखों में आंसू लेके होठो से मुस्कुराये, आँखों में आंसू लेके होठो से मुस्कुराये हं जैसे जी राहे हें कोई जीके तो बतायें” हे गाणं गात रडत आपले डोळे पुसताना पाहायला मिळत आहे. ह्या व्हिडिओवर तयावे “अलोननेस” म्हणजे एएकटेपणा असं कॅप्शन देखील दिलेलं आहे. ह्या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि त्यांच्या मनातील भावना ते व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत पण अजूनही ते कुठेतरी एकमेकांना मिस करताना पाहायला मिळत आहेत. मानसीच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना आता प्रदीप खरेरा भावुक होताना पाहायला मिळतोय. एकटेपणा मला सतावत असल्याचं तो उघडपणे बोलत असलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एकमेकांशी त्यांनी चर्चा केली तर खूप बिघडणाऱ्या गोष्टीना आळा देखील बसेल. सोशल मीडियावर त्याच्या ह्या व्हिडिओला अनेक कमेंट आलेल्या असून त्यात अनेकजण एकत्र येण्याच्या चर्चा करताना पाहायला मिळत आहेत.