एक स्ट्रॉंग कॉन्टेस्टन्ट म्हणून सोनाली पाटील हिच्याकडे पाहिलं जात. सोनालीचा जीवन प्रवास देखील खडतर आहे. अनेकांना माहित नसेल कि सोनाली हि ज्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतेले त्याच कॉलेजमधे तिने पुढे प्राध्यापिकेची नोकरी देखील केली आहे. सोनाली पाटील ही मूळची कोल्हापूरची. एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. शाहूवाडी तालुक्यातील गोंडोळी या छोट्याशा गावात तीच बालपण गेलं तिथेच ती शाळा देखील शिकली आहे. सातव्या इयतेपर्यंत तिने त्याच गावात शिक्षण घेतले पुढे उषाराजे हायस्कुलमधून दहावी पर्यंत आणि त्यानंतर राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले असे ती सांगते.

सकाळी नाटक एकांकिका करून संध्याकाळी ती शाळेतील मुलांना शिकवायला जायची. घाडगे अँड सून हि तिची पहिली मालिका पण त्या मालिकेत तिला स्वतःचा ठसा उमठवता आला नाही. विशेष म्हणजे ह्या मालिकेत तिला कोल्हापूरची लक्ष्मी साकारायला मिळाली त्यामुळेच तिने ह्या मालिकेसाठी कोणतेच मानधन घेतले नव्हते. पूढे “वैजू नंबर वन”ह्या मालिकेत तिला प्रमुख भूमिका मिळाली आता तिची लोकप्रियता वाढली. ह्यामुळेच देवमाणूस ह्या मालिकेतदेखील तिची वर्णी लागली. आता देवमाणूस ह्या मालिकेनंतर तिची लोकप्रियता पाहता तिला बिगबॉसच्या घरात एन्ट्री मिळाली. सोनालीने नुकतेच आपल्याला लग्नासाठी पाहायला आलेल्या मुलाबाबदचा किस्सा शेअर केला आहे. ती म्हणते ” माझं बीएड चालू होत. लग्नाच्या कार्यक्रमासाठी मला कोल्हापूर वरून गावाकडे बोलावलं. लग्नाच्या कार्यक्रमासाठी मी त्यांच्यासमोर खुर्चीवर बसले होते. त्यावेळी ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यांनी जो नारळ आणलेला तो न सोललेला होता त्यामुळे तो खूपच मोठा आणि वजनाला देखील जड होता.

गहू, केळी, तांदूळ, तो न सोललेला नारळ आणि ब्लाऊजपीस असं खूप काही काही असं पदरात ते भरलेलं हे सगळं घेऊन मला वाकून सगळ्यांना नमस्कार करायला लावला. त्यावेळी मला काही प्रश्न विचारून नंतर जाताना देखील मला सगळ्यांना नमस्कार करावा लागला. त्यावेळी कंटाळून मी त्यांना वाकून नमस्कार न करता उभाण्याचे नमस्कार केला. मुलीची काही रिस्पेक्ट असते कि नाही.ज्यावेळी हे सगळे गेले तेंव्हा आईने तिची कान उघाडणी करत म्हणाली तू काय उभा राहून नमस्कार म्हणत बातम्या देत होतीस का तुला वाकून नमस्कार करता येत नाही का? असं ती म्हणाली होती. मुलींनीच का बघायचं मुलींनीच का त्यांना नमस्कार घालायचा त्यांना इतका रिस्पेक्ट का द्यायचा ते कोण इतके मोठे लागून गेले म्हणून त्याच्या पुढे वाकून ४-४ वेळा नमस्कार घालायचा असं सोनाली ह्यावेळी बोलताना पाहायला मिळाली. हे सगळं बोलताना तिच्या चेहऱ्यावर खूप हसू उमठल होत. मला इतक्यात कुठं लग्न करायचं घरच्यांनी बोलावलं म्हणून मी तो कार्यक्रम केला असं देखील ती ह्यावेळी बोलली.