मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा काही महिन्यापूर्वीच दुबईत स्थायिक असलेल्या मराठमोळ्या कुणालशी विवाह झाला. मागील वर्षीच ह्या दोघांचा साखरपुडा झाला होता त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. अतिशय साध्या पद्धतीने तिने लग्न केलं होत मोजकीच मंडळी त्यावेळी तिथे हजार होती. एवढी मोठी अभिनेत्रींनी असूनही अतिशय साध्या पद्धतीने लग्न केल्याने अनेकांनी तीच कौतुक देखील केलं होत. सोशिअल मीडियावर सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे. अप्सरा म्हणून ओळख निर्माण झालेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणून हि तिला ओळखलं जात.

पण आता चर्चा रंगतेय ती सोनालीने काही दिवसापूर्वी शेअर केलेल्या त्या फोटोमुळे. आपल्या पतीसोबत देश विदेशात दीर्तनाचे तिने अनेक फोटो आजवर अपलोड केले आहेत. पण नुकताच तिने हा बॅकलेस फोटो शेअर केला आणि चाहत्यांनी तिच्यावर नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली. हा फोटो आहे Seychelles इस्ट आफ्रिकेतील आइसलँडचा. ह्या फोटोवर एका महिलेने केलेली कमेंट सर्वांचे लक्ष वेधताना दिसते. त्यात ती महिला म्हणते “तू खूप चांगली अभिनेत्री अणि डान्सर आहेस. माझी मुलगी 11 वर्षाची असून ती तुझी मोठी फॅन आहे. किमान तिच्यासाठी तरी तू असे फोटो टाकू नकोस कारण तू जसे ड्रेस घालते तसेच ती आम्हाला आणायला सांगते. एकदा चाहत्यांच देखील ऐक तुझी फॅन.”असं म्हणतात तिने कमेंट केली आहे. खरोखरच सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने घातलेले ड्रेस मुलीना घालायचा मोह होतो. ती एक उत्तम डान्सर आहे त्यामुळे अनेक मुली तिच्यासारख्या डान्स स्टेप्स करण्याचं प्रयत्न करतात. तिच्यासारख्या डान्सकेलेल्या लहान मुलींचे असंख्य व्हिडिओ तुम्हाला सोशिअल मीडियावर देखील पाहायला मिळतील.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मराठी सृष्टीत चांगली इमेज आहे. आजवर तिने अनेक मराठी चित्रपट साकारलेत. “गाढवाचं लग्न” आणि “नटरंग” ह्या चित्रपटांत तिला विशेष पसंती मिळाली. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे. तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिने अनेक सतेज शो मध्ये मध्ये नृत्य करत प्रेक्षकांची मने जिंकली. सामान्य घरातील सोनाली आज मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री बनली आहे. अनेक रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून ती काम पाहते.