बॉलीवूड मधील सर्वात आवडीची अभिनेता आणि अभिनेत्रींच्या जोडीच्या यादीमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राच्या आवडत्या अभिनेत्याची पत्नी म्हणून अनेकजण जेनेलियाला जेनेलिया वाहिनी असे देखील म्हणतात. नुकताच रितेशने कोण बनेगा करोडपतीच्या सेटवर गेलेला एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ह्या व्हिडिओमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया दोघांनी देखील ह्या खेळात सहभाग घेतलेला पाहायला मिळतो. ह्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन ह्यांना एक छोटंसं गिफ्ट देखील दिल.

आम्ही दोघे तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो असं सांगत त्यांनी अमिताभ बच्चन ह्यांना भेटवस्तू देताना रितेश म्हणाला “सर हे तुमच्यासाठी आहे, सर आम्ही एक नवीन इमॅजिन मिट्स नावाने कंपनी सुरु केली आहे. हे सगळे वेजिटेबल पदार्थ आहेत जे डायरेक्ट प्लांट्स मधून येतात. नॉनव्हेज न खाणाऱ्याना नॉनव्हेज खाण्याचा फील ह्या प्रॉडक्ट्स मुळे येतो. नगेट्स , सिककबाब, बिर्याणी असे पदार्थ आहेत जे झिरो कोलेस्ट्रॉल आणि हाय प्रोटीन पासून बनवले आहेत. जे लोक चिकन खात नाहीत त्यांना हि टेस्ट सेम चिकन सारखीच लागेल पण हे पूर्णपणे वेजिटेरिअन आहेत. तुम्हाला हे पदार्थ खाताना नक्कीच मजा येईल अशी आशा करतो. ह्यावर बच्चन म्हणतात कि तुम्ही जी हेल्थ संबंधी बोललात ह्यावर मला एक उत्तम उदाहरण आठवतंय. रितेश एकदा कार्यक्रमात आलेला तेव्हा ऑर्गन डोनेशन करताना रितेश म्हणाला कि मी स्वतःला स्वस्थ ठेवू इच्छितो कारण जेव्हा मी ते डोनेट करेल तेव्हा ते एकदम स्वस्थ असेल. ह्यावर प्रेक्षकांनी देखील टाळ्यांच्या कडकडाटात रितेशचं स्वागत केलं.