Home Entertainment म्हणून मी सोशल मीडियावर माझ्या फॅन्सना काही रिप्लाय नाही देत अभिनेत्री प्राजक्ता...

म्हणून मी सोशल मीडियावर माझ्या फॅन्सना काही रिप्लाय नाही देत अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

711
0
prajakta mali marathi abhinetri
prajakta mali marathi abhinetri

सुवासिनी या मालिकेतून प्राजक्ता माळी हिने मराठी मालिका सृष्टीत पाऊल टाकले होते. मात्र जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा माध्यमातून मुशाफिरी करत असताना प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सूत्रसंचालन करताना दिसली. तिच्या दिलखेचक अदांचे, सौंदर्याचे आणि निखळ हास्याचे लाखो चाहते आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोअर्स खूप वाढत चालला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत असलेल्या अनेक फोटोंवर तिचे चाहते नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. मात्र त्या प्रतिक्रियेवर ती कधीच रिप्लाय देताना दिसली नाही. इतर कलाकारांच्या बाबतीत असे बरेचदा घडत असते. ट्रोल होणं आणि कौतुक करणं या गोष्टींचा प्रत्येक कलाकाराला सामना करावा लागत असतो.

actress prajakta mali
actress prajakta mali

बरेचसे कलाकार ट्रोलिंगचा सामना करताना सडेतोड उत्तरं देताना दिसतात. मात्र काही निवडक गोष्टी वगळता प्राजक्ता अशा चाहत्यांना प्रतिक्रिया देण्याचे टाळते. यालाही तिने एक कारण सांगितलं आहे. मोबाईल वापरण्याबद्दल तिचं एक खास मत आहे. मोबाईलचा वापर करून आपण स्वतःला डिप्रेशन मध्ये ओढून घेतो असे प्राजक्ता म्हणते. “तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहिलं तर ती वेळ येते की तुम्ही फोनवर कितीवेळ बोलला? मेसेजमध्ये किती वेळ घालवला? व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर किती तास घालवले. ते तुम्ही रोज रोज चेक केलंत की तुमच्या लक्षात येईल की, दुसरे दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे बघायला तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ असाच वाया घालवताय. हे डिप्रेशनचं सगळ्यात मोठं कारण आहे. यातून तुम्हीच डिप्रेशनला आमंत्रण देताय…कारण ही किती मज्जा करते, ती किती मज्जा करते आणि मी काय करते तर तुम्हाला मोबाईलवर बघत बसते…ते जे करतायेत तेच तू करतीयेस ना?…मी ठरवून ठेवलंय माझ्या दिवसातल्या चोवीस तासातल्या एक तासाच्या वर सोशल मीडियाला नाही दिला पाहिजे. म्हणून मी सोशल मिडियावरच्या कमेंट्सपण वाचत नाही , मी कितीतरी शिव्या खाते माझ्या फॅन्सच्या…

marathi actress yoga
marathi actress yoga

पण माझं ठरलेलं आहे आणि म्हणून मी सोशल मीडियावर माझ्या फॅन्सना काही रिप्लाय देत नसते. तुम्ही सुद्धा हे ठरवलं पाहिजे की दिवसातील दोन तासापेक्षा जास्त वेळ मोबाईलला नाही दिला पाहिजे दोन तासांनंतर तो आपोआप बाजूला ठेवून दीला पाहिजे. ह्यामुळे डिप्रेशन पासून आपण बाजूला राहू शकतो कारण आपण आनंदी आहोत ह्याच्यावर आपला विश्वास बसत नाही मात्र दुसरे आनंदी आहेत याच्यावर आपला पटकन विश्वास बसतो. आणि त्यांचा आनंद बघून आपण खुश होतो. मात्र परिस्थिती याच्या उलटही असू शकते तेव्हा आनंदी राहायला शिका” असे प्राजक्ताचे मत आहे. मराठीतील एक प्रसिद्धी अभिनेत्री म्हणून प्राजक्ताकडे पाहिलं जात. अनेक मराठी चित्रपट आणि मालिका तसेच काही वेबसिरीज मधून ती कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येते. फक्त अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्कृष्ट डान्सर आणि निवेदिका देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here