सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात अनेक लोक विरंगुळा म्हणून मोबाईलवर कॉमेडी व्हिडिओ पाहतात. नवरा बायकोची भांडणे किंवा त्यांनी केलेले एकमेकांवरील विनोद पाहायला लोक पसंती दर्शवतात. अशीच प्रसिद्धी मिळवलेला सध्याचा सर्वात फेमस डीपी धनंजय पोवार आणि त्याच कुटुंब प्रेक्षकांची मने जिकताना पाहायला मिळतो. विशेष म्हणजे असे सोशल मीडिया स्टार आपल्याकडे काही काम नाही किंवा ह्यातच करिअर करायचं म्हणून असे व्हिडिओ करताना पाहायला मिळतात. पण डीपी धनंजय पोवार याच्या बाबतीत थोडं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इचलकरंजी येथे त्याचा द सोसायटी फर्निचर नावाने फर्निचरच भलंमोठं शोरूम आहे. शिवाय स्पोर्ट वेअर च एक दुकानही तो चालवतो. इतका सगळा व्याप मागे असून देखील आपल्यातील कला आणि लोकांना हसवत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न यातून त्याने आपला भलामोठा चाहता वर्ग तयार केला आहे.

सोशल मीडिया स्टार म्हणून आपली ओळख बनवणारा डीपी सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आला आहे. आयुष्यात मेहनत केली कि सुख आपोआप मागे येते हे त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं पाहायला मिळतंय. आता चर्चा आहे ती धनंजय पोवार याच्या बहिणीची. अहो बातमीच तशी आहे… धनंजय याची बहीण सौ. धनश्री योगेश खवरे ह्या शिरोली ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्या आहेत. नुकतंच डीपी धनंजयने याची खुशखबर आपल्या चाहत्यांना देत त्यांचे आभार मानले आहेत. यासोबत त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत विजय संपादन केल्यानतर धनंजय त्याची आई आणि निवडून आलेली बहीण सौ. धनश्री योगेश खवरे जल्लोष करताना भावुक झालेल्या पाहायला मिळत आहेत. भावाची खंबीर साथ आणि आईचा डोक्यावर हात असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं दिसून येत. सौ. धनश्री योगेश खवरे या शिरोली ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्या बद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन…