येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेत मोमो हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे मीरा जगताप. नुकतंच अभिनेत्री मीरा जगताप हिने तिच्या सोबत घातलेल्या घटना शेअर केल्या आहेत. बॉलीवूड प्रमाणेच मराठी मालिका आणि चित्रपट मिळवण्यासाठी अभिनेत्रींना वाट्टेल तास वागवलं जात असल्याचं ह्यावेळी उघड झालं आहे. मराठी अभिनेत्रींनी ह्या पूर्वी देखील कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागतं असे अनेक किस्से शेअर केले आहेत. अनेक महिलांनी ह्यापासून दूर जात अभिनयाला रामराम देखील ठोकला आहे.

अभिनेत्री मीरा जगताप म्हणते ” मला एकाच व्यक्तीकडून एकदा नाही तर दोनदा असा वाईट अनुभव आलाय, मालिका आणि चित्रपट मिळवून देतो पण तुला मी सांगेल तस करावे लागेल. शॉर्टकट मारून प्रसिद्ध मुळीच प्रसिद्धी मिळवता येत नाही त्यामुळे मी तेथून काढता पाय घेतला. काम मिळवण्यासाठी कोणतीही ऍडजेस्टमेंट कारण मला मुळीच पसंद नाही. एका व्यक्तीने मला मालिकेत काम मिळवून देतो ह्या बहाण्याने चक्क माझा हात पकडला होता त्यावर मी लगेचच त्याच्या कानाखाली मारत तिथून निघून गेले होते. अश्या व्यक्तीं पासून चार हात लांब राहून मी तब्बल २ वर्ष अभिनयापासून दूर राहिले मी खूपच डिप्रेशन मध्ये गेले होते. अनेक महिला अश्या प्रकारांमुळे अभिनय क्षेत्राला रामराम ठोकतात आणि त्याची स्वप्ने धुळीला मिळतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगली माणसे देखील आहेत जी तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. अभिनेत्री मीरा जगतात हिने शेअर केलेल्या वाईट अनुभवामुळे बॉलीवूड प्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील खूप वाईट समस्यांना तोंड द्यावं लागतं असंच म्हणावं लागेल.