एकाच व्यक्तीने उच्चशिक्षित दोन जुळ्या बहिणी सोबत लग्न केल्याचं तुम्ही ह्यापूर्वी कधी ऐकलं नसेल. पण नुकतंच असं घडलय रिंकी आणि पिंकी ह्या दोन जुळ्या इंजिनियर बहिणीनी एकाच पुरुषा सोबत विवाह केला आहे. सोशल मीडियावर ह्या लग्नाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह रिंकी आणि पिंकी राहत होत्या. घडलं असं कि दोघींची आई नेहमी आजारी असायची. घरात कोणी पुरुष नव्हता जो आईला आजारपणात वेळोवेळी मदतीला धावून येईल. अश्यातच टॅक्सीचा व्यवसाय करणारा अतुल ह्यांच्या मदतीला धावून आला. वेळोवेळी त्याने आईला मदत केली. ह्या दोन जुन्या बहीणी पैकी एकाच अतुल सोबत खूपच पटायचं. त्यांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आपली बहीण प्रेमात पडली आणि ती अतुल सोबत लग्न करू इच्छिते हे पाहून दुसऱ्या बहिणीने देखील एक अजब निर्णय घेतला.

रिंकी आणि पिंकी ह्या दोन जुळ्या बहिणी एकाच शाळेत शिकल्या. एकाच कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि आता एकाच कंपनीत दोघीही कमला आहेत. मग एकीने अतुलची निवड करून वेगळा संसार करणार हे ह्या दोघीना पटलं नाही. मग एक अजब निर्णय दोघीनी घेतला, त्या दोघीनी अतुल ह्याच्या सोबत विवाह करण्याचं ठरवलं अतुलला देखील दोघींचं म्हणणं पटलं. मग काय घरच्यांच्या परवानगीने ह्या तिघांनी लग्न करायचं ठरवलं आणि लग्न देखील केलं. एकाच मांडवात दोन बहिणी आणि एक नवरदेव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. इथे एकीसोबत संसार करून तिला नांदवन जड जात मात्र पठयाने एकाच मांडवात चक्क दोन जुळ्या आणि उच्च शिक्षित तेही निकरी करणाऱ्या मुलीं सोबत विवाह केला. हे तिघेही स्वतःच्या पायावर उभे असल्याने संसाराचा गाडा ते सहज पेलवू शकतात पण सगळं काही इतकं सोपं नसतं ना म्हणून कि काय आता घ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकाच मांडवात हिंदू परंपरेने केलेल्या अश्या लग्नाला मान्यता मिळत नाही असे सांगत ह्या तिघांवर आता गुन्हा दाखल झाला असून ह्याचा निर्णय काय लागतो ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे हे तिघे देखील सज्ञान आहेत. काही असो पण ह्या तिघांची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे हे मात्र नक्की.