स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा हि मालिका प्रसिद्धीच्या झोतात आहे मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या अभिनयामुळे मालिकेने उत्तम यश संपादन केले आहे. मालिकेतील अभिनेत्री “शाल्मली तोळे” हिने ह्या मालिकेत उत्तम अभिनय साकारला आहे. तिने ह्यापूर्वी अवघाची हा संसार, गोजिरवाण्या घरात, या सुखांनो या, हा खेळ सावल्यांचा, दुर्वा, स्वराज्यरक्षक संभाजी अश्या अनेक मालिकांत अभिनय साकारला आहे. फक्त मराठीच नाही तर चुपके चुपके, श्री या हिंदी मालिका देखील केल्या आहेत.

शाल्मली तोळे हिने “मैं हुं ना” या हिंदी चित्रपटातही भूमिका साकारली होती. सध्या सुरु असलेली रंग माझा वेगळा ह्या मालिकेत तिने लावण्याची भूमिका ती साकारत आहे. शाल्मली तोळे हिला एक बहीण देखील आहे, शाल्मली आणि पल्लवी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. खूपच कमी लोकांना हे माहित आहे कि पल्लवी हि उत्तम डान्सर आहे. कलर्स वाहिनीवर “डान्स दिवाने सिजन 3” हा रियालिटी शो मध्ये ती पाहायला मिळतेय. पल्लवी तोळे ही डान्सर आहे तसेच बॉलिवूडमधील बऱ्याच नामवंत कोरिओग्राफरच्या हाताखाली तिने असिस्टंट म्हणून काम केले आहे. डीआयडी सुपर मॉम्स सिजन 2 मध्ये तिने पार्टीसिपेट केले होते. सह्याद्री वाहिनीच्या दम दमा दम सिजन 2 चे सुत्रसंचालनही तिने केलेले होते. पल्लवीला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. आपली आणि आणि बहिणीच्या प्रेरणेनेच ती आजवर हे यश गाठू शकली आहे. कथ्थक आणि फोक डान्समध्ये तिने प्रशिक्षण घेतले. शाल्मली आणि पल्लवी या दोघी सख्ख्या बहिणीना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…