अभिनेत्री म्हटलं कि चित्रपटातील अभिनयानुसार वेशभूषा वाणी त्या त्या अभिनयासाठी अभिनित केली जाते पण ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नसतो. अनेक लोक आजच्या युगातही अभिनेता किंवा अभिनेत्रींना मालिकेत किंवा चित्रपटात ते जसे वागतात तसेच ते खऱ्या आयुष्यात असतील अशी भ्रामक कल्पना करतात. मग चित्रपटात अभिनेत्रीने कसा अभिनय केला तशीच तिची छवी आहे अस समजतात. खरतर हे अभिनेत्री साठी जमेची बाजू असते. आपण खरोखरच उत्तम काम करून त्या पात्राला न्याय दिलाय हेच त्यातून सिद्ध होत. पण कधीकधी त्या गोष्टीचा नाहक त्रास देखील सहन करावा लागतो. नुकताच असाच काहीसा प्रकार मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या बाबतीत घडताना पाहायला मिळतोय.

घडलं असं कि अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ४ दिवसांपूर्वी गुरुचरित्र संदर्भातील एक पोस्ट शेअर केली होती. अनेकांनी त्यावर चांगल्या कमेंट्स देखील केल्या. पण काही लोक सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात. तर काही लोक जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला ट्रोल करताना पाहायला मिळतात. अभिनेत्री अमृताच्या पोस्टवर देखील एका व्यक्तीने तिला असच ट्रोल केललं पाहायला मिळत आहे. गुरुचरित्राबद्दल बोलायची लायकी नाही तुमची. शरीर दाखवणाऱ्यांनी याबाबत बोलू नये. असं म्हटलं आहे. ती एक कलाकार आहे आणि ती तिची कला सादर करतेय हे लोक येथे विसरून जातात आणि अश्या कमेंट करताना पाहायला मिळतात. ह्या कमेंटवर अभिनेत्री अमृता खानविलकर देखील चांगलीच संतापली तिने देखील रिप्लाय देत म्हटलं कि “कोण तुम्ही .. अश्या भाषेत पुन्हा बोललात तर पोलीस कम्प्लेंट करेल समजलं, ह्या बाबतीत मी उगाच कोणाचं ऐकून घेणार नाही.” अनेक लोक कलाकारांना उगाचच उपदेश किंवा नको ते बोलताना पाहायला मिळतात पण त्यांचं खार आयुष्य देखील आपल्या सारखंच आहे हे आपण विसरून जातो.