Home Movies आमचं कोकण “समृद्धीची” वाट बघताय गेली १२ वर्ष असं म्हणत अभिनेता अभिजित...

आमचं कोकण “समृद्धीची” वाट बघताय गेली १२ वर्ष असं म्हणत अभिनेता अभिजित केळकरने केला रोष व्यक्त

710
0
abhijeet kelkar marathi actor
abhijeet kelkar marathi actor

चांगला रस्ता झाला कि आपोआप तेथील व्यवसाय वाढीला लागतात. इतकंच नव्हे तर नवनवे व्यवसाय देखील येतात. तेथील दरडोई उत्पादननिर्मित मूल्य वाढत. मराठी अभिनेता अभिजित केळकर याने काल त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याच गोष्टीवर बोट ठेवलेलं पाहायला मिळाला एक पोस्ट शेअर करत त्यात त्याने खंत व्यक्त करत लिहलं कि, “आमचं कोकण “समृद्धीची” वाट बघताय गेली १२ वर्ष ” नुकताच अभिजित दत्त जयंती निमित्त आपल्या गावी कोकणात जाऊन आला. पण तेथील परिस्तिथी पाहता तो म्हणतो “मराठवाड्याचा विकास होतो आहे ह्याचा मलाही आनंदच आहे की… फक्त आमचा कोकण महामार्ग गेली अनेक वर्ष पूर्ण होण्याचं नावंच घेत नाहीये त्याबद्दलची खंत,चीड मी व्यक्त केली आहे. कोकणात जिथे जिथे प्रकल्प आलेत,तिथल्या जवळच्या समुद्रकिनारी जाऊन बघा , सत्यानाश होतोय तिथल्या निसर्गाचा, त्यावर अवलंबून उद्योग धंद्यांचा, पर्यायाने आपलाही..

actor abhijeet kelkar
actor abhijeet kelkar

पण म्हणून खडखडत्या रस्त्यांवरून,जीव मुठीत धरून नाही ना जाऊ येऊ शकत आपण,भीषण आहे रे अवस्था, मला राजकारणात ना रस आहे ना त्याबद्दल आत्ता काही बोलायचं आहे आत्ता दत्तजयंतीला जाऊन आलोय मी. ” कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. अश्या भूमीत आपण जन्मलो ह्याचा अभिजीतला अभिमान आहे. मग तेथे किमान सुखकर जीवन जाण्यासाठी मूलभूत गरजा तरी मिळाव्यात एवढीच त्याची अपेक्षा आहे. काल ११ डिसेंबर रोजी नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महार्गाचा पहिला टप्पा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होता. आधी नागपूर ते शिर्डी हे १० तसंच अंतर ह्या महामार्गामुळे फक्त ५ तासांमध्ये पार करता येणार आहे. यामुळे नागपूरचा मोठा विकास होताना पाहायला मिळणार आहे. ह्याच मुद्यावरून काल अभिनेता अभिजित केळकर आपल्या कोकणचा विकास कधी होणार ह्याची वाट पाहताना दिसत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने आपला रोष व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here