प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच लागून असते पण प्रसिद्धी मिळाल्यानंतर ते अचानक गायब का झाले ह्याकडे कोणाचं सहसा लक्ष जात नाही. नुकतच अभिनेते डॉ विलास उजवणे हे गेल्या ६ वर्ष पासून गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. ६ वर्षांपुर्वी ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. मात्र तेव्हा पासूनच त्यांना या आजाराने सतत ब्रेनस्ट्रोक येत आहेत. गेल्या ६ वर्षांपासून ते आजाराला झुंज देत असल्यामुळे आयुष्यभर काम करून जमलेला पैसे देखील संपला असल्याचं उघड झालं. एक प्रसिद्ध कलाकार आज अश्या अवस्तेत जगतोय मग सामान्य माणसाच्या आयुष्यात काय होत असेल हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. अभिनेते डॉ विलास उजवणे यांच्यामागे पत्नी आणि त्यांचे मित्र मंडळी आजारपणात साथ देताना पाहायला मिळतात पण गेल्या ६ वर्षात मोठा खर्च झाला असून पुढेही मोठा खर्च होणार आहे.

डॉ विलास उजवणे ह्यांच्या बाबतील असं घडण्यापूर्वी देखील अनेक कलाकारांच्या बाबतीत असं घडलं आहे, फक्त ते उघड झालं नव्हतं. असाच काहीसा प्रकार मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात घडला आहे त्याबद्दल जाणून घेऊयात… ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि पेशाने शिक्षिका असलेल्या विद्या पटवर्धन या देखील आजाराने त्रस्त असून आता काही दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळून असल्याची माहिती मिळते. विद्या पटवर्धन या बालमोहन शाळेत शिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळत असत. एवढेच नाही तर आपल्या मिळालेल्या पगारातून त्या मुलांना खाऊ वाटप करत असत. बाळाचे बाप ब्रह्मचारी, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, अगं बाई अरेच्चा, चिकट नवरा, आणि काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला भिकारी ह्या चित्रपटात देखील त्यांनी सहभाग दर्शवला. गेल्या काही वर्षांपासून त्या गंभीर आजाराने त्रस्त असून आता त्यांना चालता देखील येत नाही. आयुष्यभर शिक्षिकेची नोकरी करताना शाळेतील मुलांवरच त्यांनी खर्च केला. कधी मुलांना खाऊ, शाळेची फी तर काही मुलांना शाळेत लागणाऱ्या वस्तू देखील त्या पुरवत. त्यांचा पैसा आयुष्यभर इतरांच्या गरजा भागवण्यातच गेला आता त्यांनाच माहितीच्या हाताची आणि आपुलकीची गरज भासू लागली आहे. विद्याताई आता एका जागेवर बसून अंथरुणाला खिळून असतात आजारपणामुळे त्यांना चालत आणि बोलताही येत नाही. विद्याताई साऱखी आणखीन एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत ज्या अंथरुणाला खिळून आहेत.

जेष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर (झपाटलेला मधील लक्ष्याची आई) या अनेक वर्षांपासून कला क्षेत्रापासून दूर आहेत झालं असं कि, २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते, मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला. रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. या कार्यक्रमात त्या तब्बल १२ वर्षांनंतर नृत्य सादर करणार होत्या १२ वर्षांपूर्वी अशाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतरही त्यांनी आपली ही कला मंचावर सादर केली होती. याच आजारपणामुळे आज त्या अंथरुणाला खिळून आहेत. आज बोलण्याला कुठलिही प्रतिक्रिया किंवा हालचाल त्या करत नाहीत. पण त्यांच्या पाठीशी मुलगा प्रीतम आणि सून शीतल खंबीरपणे साथ देताना पाहायला मिळतात. त्यामुळे किमान त्यांच्या बाबतीत तरी पैश्याची उणीव भासत नसल्याचं आढळून येत. आजारपण पैश्यापेक्षा कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे याचीच खरी गरज असते.