येत्या २१ डिसेंबर २०२२ पासून झी मराठी वाहिनीवर “लोकमान्य” हि मालिका प्रसारित होणार आहे. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक यांच्या जीवनावर आधारित हि मालिका झी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !” या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. बाळ अथवा केशव गंगाधर टिळक यांची भूमिका अभिनेता क्षितिज दाते साकारत आहे. तर सोबतीला अभिनेत्री स्पृहा जोशी (सत्यभामाबाई) पाहायला मिळणार आहे. अभिनेता क्षितिज दाते हा ह्यापूर्वी देखील अनेक चित्रपटात आणि काही मालिकांत देखील चांगल्या भूमिका केलेल्या पाहायला मिळाल्या यामुळेच त्याला केशव गंगाधर टिळक यांची भूमिका साकारायला मिळाली.

क्षितीजची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर तो अनेक चित्रपटात काम करताना पाहायला मिळाला. सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर यांसारख्या चित्रपटात त्याने उत्तम अभिनय केला. तर हिंग पुस्तक तलवार आणि ब्लाइंड मेन या काही वेबसिरीज त्याने केल्या. २५ एप्रिल २०२१ रोजी त्याने आपली मैत्रीण ऋचा आपटे सोबत विवाह केला. ऋचा हि देखील मराठी अभिनेत्री आहे. क्षितीज आणि ऋचाने ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्रीत काम केले होते. एकत्रित काम करत असताना सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते जुळले. त्यानंतर हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि नंतर या दोघांनी लग्न केलं. ऋचाने ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांच्या लग्नात ऋचाने आवर्जून हजेरी लावलेली पाहायला मिळाली. इतकच नाही तर अक्षयाच्या लग्नातली साडी विणताना तिने हार्दिकची मदत देखील केली होती. महेश मांजरेकर यांच्या ‘एका काळेचे मणी!’ या वेब सिरीजमध्ये समीर चौघुले, विशाखा सुभेदार, ऋता दुर्गुळे, वंदना गुप्ते, प्रशांत दामले यांच्यासोबत ऋचा आपटे देखील पाहायला मिळाली.