Home Entertainment ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या चर्चा इतक्या का रंगतात स्पष्टीकरण...

ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या चर्चा इतक्या का रंगतात स्पष्टीकरण देऊनही चर्चा थांबेनात

6017
0
ruturaj and actress sayali sanjiv
ruturaj and actress sayali sanjiv

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा सलामीचा बॅट्समन म्हणून ओळखला जातो. ह्या सिजनमध्ये देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक धावा काढल्या आहेत. आयपीएल सामन्यातील त्याची कामगिरी पाहता ह्या टी२० विश्व कप नंतर त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळणार असल्याचं बोललं जातंय. पण अनेक दिवसांपासून ऋतुराज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी अभिनेत्री आणि ऋतुराज गायकवाड ह्यांचं नाव अनेकदा जोडलेलं पाहायला मिळत. या मराठी अभिनेत्रीच नाव आहे सायली संजीव. पण हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात…

hruturaj gaikwad and sayali sanjiv

hruturaj gaikwad and sayali sanjiv

मराठी अभिनेत्री सायली संजीव हिने काही दिवसांपूर्वी तिच्या चाहत्यांसाठी सोशिअल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ह्या तिच्या फोटोवर क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याने ओहं .. अशी कमेंट केली होती त्यानंतर अभिनेत्री सायली संजीवन हिने त्यावर हार्ट आणि स्माईलचे इमोजीस चा रिप्लाय केला होता. आणि बस झाली इथून ह्या दोघांच्या चर्चेला सुरवात. त्यांनतर अनेकांनी ऋतुराज आणि सायली ह्यांनी शेअर केलेल्या अनेक फोटोवर दोघांबाबद विचारणा केली. इतकंच नाही तर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्याही चर्चेला उधाण आलं होत. हे सर्व पाहता ऋतुराज गायकवाड ह्याने सोशिअल मीडियावर ह्यासंदर्भात स्पष्टीकरण देत म्हणाला होता कि “माझी विकेट फक्त बॉलर घेऊ शकतो. ते देखील पूर्णपणे क्लीन आणि बोल्ड. बाकी इतर कुणी नाही” आणि हा विषय इथेच संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण एखाद्याच नाव कोणाशी जोडलं गेलं कि पुढे हि ते तसेच लावायची नेटकऱ्यांची सवय आजही तशीच कायम आहे. आता नुकतंच सायली संजीव जिने साडीतील व्हिडिओ शेअर केला होता तर त्यावरही अश्याच चर्चा रंगताना पाहायला मिळाल्या.

cricketer ruturaj gaikwad
cricketer ruturaj gaikwad

पण आपलं करिअर सांभाळत ऋतुराज आणि सायली ह्या दोघांनीही अश्या कमेंट्स कडे दुर्लक्ष केलेलं बर. ऋतुराज गायकवाड हा उमद्या खेळाडू आहे उगींचीच त्याला अश्या प्रकारे त्रास देणं योग्य नाही स्पष्टीकरण देऊनही लोक ऐकत नसतील तर त्यांकडे दुर्लक्ष करण हा एकच पर्याय राहतो. ऋतुराज गाईकवाडला अजून बराच पल्ला गाठायचाय हि तर फक्त सुरवात आहे. इंटरनॅशनल सामन्यात त्याला टी२०, वन डे, आणि कसोटी सामन्यात झळकायचंय. त्यामुळे अश्या यूजर्सना आणि अश्या बातम्या पसरवणाऱ्यापासून त्याने चार हाथ लांबच राहिलेलं बर. लोकांना बोलायला फक्त कारणच लागतं पण त्यात अडकून न राहता आपण पुढे चाललेलं केंव्हाही चांगलं. “ऋतू का राज”येण्यासाठी त्याने अजून मेहनत घेऊन यश संपन्न करावं आणि भारतीय संघात येऊन आपलं नाव सुवर्ण अक्षरात करावं हीच आमची अपेक्षा ऋतुराजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here