हिंदी बिग बॉस चे आतापर्यंत अनेक पर्व सुपर हिट ठरले आहेत. हिंदी बिग बॉस च्या पर्वांना लोकप्रियता मिळाल्यावर त्याचे अनुकरण करत मराठी बिग बॉस आपल्या भेटीला आले. मराठी बिग बॉस हे कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात आले होते. आपला मराठी बिग बॉस ह्या मालिकेच्या निमित्ताने महेश मांजरेकर हे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. बिग बॉस मराठीचे पहिलेच पर्व त्यातील कलाकारांमुळे चांगलेच गाजले होते. मेघा धाडे ही बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती.

पहिलं सिजन गाजल्यावर कलर्स वाहिनी ह्या मालिकेचं दुसरा सिजन घेऊन आली होती. बिग बॉस मराठी सिजन 2 हे पहिल्या सिजन पेक्षा ही तुफान गाजल होत. शिव ठाकरे हा सिजन 2 चा मानकरी ठरला होता. त्यात अभिजित बिचुकले हे एक मनोरंजक व्यक्तिमत्त्व आपल्याला पाहायला मिळालं होत. सोबतच शिव आणि वीणा ह्यांची प्रेमकहाणी ही इथूनच सुरू झाली होती. अभिनेत्री शिवानी सुर्वे ही पण चांगलीच चर्चेत राहिली होती. गाजलेल्या दोन पर्वांमुळे बिग बॉस मालिकेचे चाहते आतुरतेने पुढच्या पर्वाची वाट बघत होते. पण मध्यंतरी ह्या मालिकेचा पुढचा सिजन येणारं नसल्याचे सांगितले जात होते. कोरोनाच्या संकटामुळे हा सिजन रद्द झाल्याच्याही बातम्या येत होत्या. आणि त्यामुळे चाहते नाराज झालेले दिसून येत होते. परंतु आता बिग बॉस मराठी सीजन 3 बद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठी सिजन 3 चा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे. आणि त्या सोबतच त्यांनी म्हटलं की ” मी परत येतोय. तुम्ही तयार राहा.” मराठी बिग बॉस लवकरच कलर्स वाहिनीवर…त्यांनी केलेल्या ह्या पोस्ट मुळे बिग बॉस मराठी चा सिजन 3 हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ह्यात काही शंकाच नाही. पण अजुनही प्रेक्षकांना हा शो टीव्ही वर कधी पाहायला मिळणार शिवाय सिजन 3 मधे कोण कोणते नवीन कलाकार सामील होणार आहेत, ह्याबद्दल ची उत्सुकता कायम आहे.