मराठी अभिनेता तसेच दिग्दर्शक अशी “राजेश देशपांडे” ह्यांची ख्याती आहे. पुढचं पाऊल ही मालिका असो वा कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक, करून गेलो गाव , हिमालयाची सावली, धुडगूस , धनंजय माने इथेच राहतात अशा अनेक सुन्दर कलाकृतींचे अभिनय तसेच दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचा मुलगा हा स्टार प्रवाह वरील “मुलगी झाली हो ह्या मालिकेत उत्तम भूमिका साकारताना पाहायला मिळतोय. पण अनेकांना त्याची कल्पना नाही कि तो कलाकार अभिनेते राजेश देशपांडे ह्यांचा मुलगा आहे. चला तर त्याच्या बद्दल जाणून घेऊयात.

मुलगी झाली हो मालिकेत माऊचा भाऊ म्हणजेच रोहन पाटीलची भूमिका साकारली आहे अभिनेता “सृजन देशपांडे” ह्याने. मालिकेतला रोहन काही दिवसांपूर्वीच आर्यासोबत विवाहबद्ध झाला होता. ही भूमिका विरोधी असली तरी त्याच्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सृजन बद्दल जाणून तुम्हाला कौतुक वाटेल की, सृजन येळवण गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध समाजसेवक, राजकीय व्यक्तिमत्व आणि शिक्षणप्रेमी चंद्रकांत देशपांडे यांचा नातू आहे एवढेच नाही तर प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता “राजेश देशपांडे” यांचा तो मुलगा आहे. पुढचं पाऊल ही मालिका असो वा कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक, करून गेलो गाव , हिमालयाची सावली, धुडगूस , धनंजय माने इथेच राहतात अशा अनेक सुन्दर कलाकृतींचे अभिनय तसेच दिग्दर्शन त्यांनी केले आहे. सृजनचे काका रोहन देशपांडे हेही एक उत्तम लेखक, दिग्दर्शक व संकलक आहेत. त्याची आई रूईया महाविद्यालयात एकांकिका करीत होत्या. सध्या त्या कर्णबधीर मुलांना शिकवतात वडील, काका आई यांचे लहानपणापासूनच योग्य मार्गदर्शन त्याला मिळत गेले आणि त्यामुळे सृजनला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला असेही म्हणायला हरकत नाही. त्यातून, लहानपणापासूनच त्याला अभिनयाचे वेड म्हणून नाटुकली, एकांकीका, नृत्य अशा स्पर्धांमध्ये तो नेहमीच सहभाग दर्शवत असे. मुलगी झाली हो ही त्याने अभिनित केलेली पहिलीच मालिका आहे या मालिकेतून त्याने साकारलेले रोहनचे पात्र विशेष लक्षवेधी ठरले आहे.