Home Actors शेंडी नका ओढू म्हणणाऱ्या ट्रोलरला गश्मीर महाजनीने दिले सडेतोड उत्तर

शेंडी नका ओढू म्हणणाऱ्या ट्रोलरला गश्मीर महाजनीने दिले सडेतोड उत्तर

5177
0
gashmeer mahajani actor
gashmeer mahajani actor

अभिनेता गश्मीर महाजनी मराठी सृष्टीतील एक हँडसम हंक ऍक्टर म्हणून ओळखला जातो. त्याचे फिटनेस आणि डान्सचे तर अनेक तरुण तरुणी दिवाने आहेत असे म्हणायला हरकत नाही. गश्मीर महाजनी सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. या माध्यमातून तो नेहमीच आपल्या चाहत्यांच्या भेटीला तो येत असतो. गश्मीरला मुलगा झाला त्यावेळी त्याने आपल्या मुलाचा चेहरा आताच दाखवणार नसल्याचे सांगितले होते तो जसजसा मोठा होईल तसतसा तो लोकांसमोर येईल असे त्याने त्यावेळी म्हटले होते. परंतु असे असूनही मधल्या काळात त्याने बऱ्याचदा आपल्या मुलासोबत मजा मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

आज गश्मीरने आपल्या मुलासोबत फोटो शेअर करून ‘नारीयल पाणी, एनीवन’ असे कॅप्शन देऊन आपल्या मुलाचे केस ओढले होते. त्याच्या या फोटोवर अनेकांनी मजेशीर कमेंट देखील केलेल्या पाहायला मिळाल्या. यासोबतच एकाने गश्मीरला “काका शेंडी नका ओढू हो,धर्म आहे आपला तो.!” अशी खोचक प्रतिक्रिया दिली. यावर गश्मीरने या ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला कानउघडणी करून आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. ट्रोल करणाऱ्याच्या प्रतिक्रियेवर गश्मीर म्हणतो की, ” मुळात ही त्याची शेंडी नाही.. तो फक्त २ वर्षांचा आहे. मुंज्य झाली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पण पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करु नका.” ट्रोलरला असे सडेतोड उत्तर मिळताच त्याने पुन्हा एकदा कमेंट करून “बाकी तुमच्या बॉडी वर जानवं उठून दिसतंय म्हणून” आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गश्मीरने ट्रोलरला दिलेली ही सणसणीत चपराक सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि त्या ट्रोलरला इतरांकडूनही आता चांगलीच कानउघडणी सुद्धा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here