Home Actors अभिनेत्री गौतमी देशपांडे थोडक्यात बचावली.. आपल्या सोबत इतरांनाही वाचवण्याचे केले धाडस

अभिनेत्री गौतमी देशपांडे थोडक्यात बचावली.. आपल्या सोबत इतरांनाही वाचवण्याचे केले धाडस

5459
0
gautami deshpande actress pic
gautami deshpande actress pic

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने आज एक अनुभव शेअर करून चाहत्यानाही सतर्क राहण्याचा मेसेज दिला आहे आज पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस वे ने शूटिंगसाठी येत असताना गौतमी देशपांडे हिची खोपोलीच्या अलीकडे साधारण घाटात असताना अचानकपणे गाडी स्लिप व्हायला लागली. यावेळी काय घडत होते ते तीला अजिबात समजत नव्हते तिला वाटले की टायर बर्स्ट झाला असावा म्हणून स्टेअरिंगवरचा कंट्रोल जाऊन चाक घसरत असावे. लकिली गौतमीची गाडी स्पीड मध्ये नव्हती आणि देवकृपेने गाडीवर तिला लगेचच ताबा मिळवता आला.

gautami deshpande

मधल्या लेनमधून गाडी कंट्रोल करून तिने हळूहळू गाडी पुढे नेली पण अचानकपणे मागून एक गाडी आली आणि ती पुढे जात जवळपास गोल गोल फिरून धडकली. गौतमीची गाडी शेजारून जात असतानाच हा सर्व प्रकार घडल्याने पाहून गौतमी खूपच घाबरली होती. गाडीतील सर्वजण सुखरूप असलेले तिला दिसले पण स्वतःची गाडी कंट्रोलमध्ये नसल्याने तिला तिथे थांबता आले नाही. पुढे साधारण एक ते दोन किलोमीटर अंतरावर गेल्यावर फूडमॉलजवळ आपली गाडी थांबवून तिने गाडीचे टायर चेक केले सर्व व्यवस्थित असलेले पाहून तिने एक्सप्रेस वे पोलीस असिस्टंटला फोन लावला. पोलिसांनीही सहकार्य दर्शवत ही घटना कुठे घडली याची चौकशी गौतमीकडे केली. साधारण लगेचच १५ मिनिटानंतर गौतमीला पोलिसांचा फोन आला आणि आम्ही सर्व नीट केलं आहे असे सांगितले यासोबतच घटनेच्या ठिकाणी रस्त्यावर डिझेल सांडलं होतं म्हणून गाडी स्लिप होत होती.

आम्ही ते आता स्वच्छ केलं असल्याचंही त्यांनी तिला कळवलं. काम झालं आहे अशी आठवण फोनवरून सांगितल्याची त्यांची तत्परता गौतमीला खूपच भावून गेली आहे. त्या तसदीबद्दल तिने त्यांचे आभारही मानले आहेत. आपल्याला आलेल्या या अनुभवावरून गौतमीने आपल्या चाहत्यानाही आवाहन करत एक्सप्रेस वे पोलीस असिस्टंटचा फोन नंबर जवळ बाळगण्यास सांगितले आहे जेणेकरून या अनुभवावरून मागचे चार जण वाचू शकतात. असं काही घडल्यावर लगेचच एक्सप्रेस वे पोलीस असिस्टंटला कळवा आज माझी गाडी स्पीडमध्ये नव्हती नाहीतर आज माझी गाडी कदाचित त्यामुळे पलटी देखील होऊ शकली असती किंवा काहीतरी मोठी दुर्घटना देखील घडू शकली असती. गाडी घाटात होती आणि ती स्पीडमध्ये नसल्याने मी आज सुखरूप आहे. परंतु यासोबतच गौतमीने एक्सप्रेस वे पोलीस असिस्टंटचा फोन नंबर तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. जे लोक नेहमी कामानिमित्त पुणे मुंबई असा प्रवास करतात त्यांनी तो फोन नंबर जरूर स्वतःकडे ठेवावा असेही आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here