महेश कोठारे यांनी मोठ्या पडद्यावरून दे दणादण, झपाटलेला, माझा छकुला, धडाकेबाज असे अनेक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले. धमाल मनोरंजन करणाऱ्या या सर्वच चित्रपटांना आजही प्रेक्षकांकडून विशेष पसंती देखील मिळते. मोठा पडदा गाजवल्यानंतर महेश कोठारे छोट्या पदद्द्याकडे वळाले जय मल्हार, विठू माऊली, प्रेम पॉईजन पंगा, एक होती राजकन्या अशा धार्मिक आणि कौटुंबिक मालिका त्यांनी प्रेक्षकांसमोर आणल्या. नुकतेच स्टार प्रवाह वाहिनीवरील विठू माऊली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
girija prabhu
या मालिकेनंतर कोठारे व्हिजन प्रस्तुत एक नवी कौटुंबिक मालिका ते प्रेक्षकांसमोर आणत आहेत. “सुख म्हणजे नक्की काय असतं?” ही नव्याने येऊ घातलेली मालिका लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो देखील महेश कोठारे यांनी नुकताच आपल्या फेसबुकवरून शेअर केला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेत “गिरीजा प्रभू” ही अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारत आहे. गिरीजा प्रभूने नुकतेच झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. याआधी तिने तुझा दुरावा, काय झालं कळना अशा काही चित्रपटातून प्रमुख भूमिका बजावली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेनिमित्त तिला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी गिरीजा प्रभू हिला खूप खूप शुभेच्छा..