चेकमेट, सावरखेड एक गाव, हृदयांतर, तेरे लिये, नवरा माझा भवरा अशा हिंदी मराठी चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. बॉलिवूड तसेच हिंदी मालिका अभिनेता विजय आनंद यांच्याशी सोनाली खरे विवाहबद्ध झाली. “प्यार तो होना ही था” या बॉलिवूड चित्रपटातून विजय आनंद ने काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘आसमान से आगे ‘, ‘यश’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘स्माईल प्लिज’ हे चित्रपट आणि काही हिंदी टीव्ही मालिकेतून विजय आनंदने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
sonali khare with daughter
सोनाली आणि विजय आनंद यांना एक मुलगी आहे सनाया आनंद हे तिचे नाव. २२ जुलै २००८ रोजी सनायाचा जन्म झाला. सनाया नुकतीच बारा वर्षाची झाली असून लवकरच ती एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर “Blood relation” नावाने एका शॉर्टफिल्ममध्ये ती झळकणार असून या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले अभिनेत्री सई देवधर हिने केले आहे. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिहेरी भूमिकेतून सई देवधर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे आणि बॉलीवूड चित्रपटांतील एकेकाळचा प्रसिद्ध अभिनेता विजय आनंद ह्यांची मुलगी सनाया आनंद हीच अभिनय पाहण्यासाठी सारेच उत्सुक असल्याचे पाहायला मिळतायेत आपल्या आई वडिलांप्रमाणेच तीही अभिनयात यश संपादन करेल अशी आशा आहे. तूर्तास “सनाया आनंद” हिच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणानिमित्त खूप खूप शुभेच्छा..