सोनी मराठी वाहिनीने उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेली “अजूनही बरसात आहे” ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आणली. यातून मीरा आणि आदिराजची प्रेम कहाणी प्रेक्षकांना खूपच भावली आहे. त्याच मुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिकण्यास समर्थ ठरली आहे. मुक्ता बर्वे, राजन भिसे, राजन ताम्हाणे, उमा सरदेशमुख, उमेश कामत ,सुहिता थत्ते या तगड्या कलाकारांमुळे आणि त्यांच्या सजग अभिनयाचे हे खरे यश म्हणावे लागेल.

मालिकेत आणखी एक असे पात्र आहे ज्याला अजूनही फारसा वाव मिळालेला नाही. हे पात्र आहे मिराच्या मैत्रिणीचे. मिराची मैत्रीण तिच्याच क्लिनिकमध्ये तिला भेटत असते ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने. स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेतून पल्लवी वैद्य ने पुतळामातोश्रींची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला ऐतिहासिक पात्र साकारण्याचे भाग्य लाभले होते असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती. या मालिकेनंतर चला हवा येऊ द्या च्या मंचावरूनही तिने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला. अगंबाई अरेच्चा! या चित्रपटातून पल्लवीने अभिनय क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले होते. कुलवधू ह्या लोकप्रिय मालिकेत पल्लवी झळकली होती. पल्लवी वैद्य ही दिग्दर्शक केदार वैद्य ची पत्नी आहे. झिपऱ्या, माझ्या नवऱ्याची बायको या चित्रपट आणि मालिकेचे दिग्दर्शन त्याने केले आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेचे दिग्दर्शन देखील केदार वैद्य करत आहे. एकाच मालिकेमुळे हे दोघेही एकत्रितपणे काम करताना दिसतात.

केदार कॅमेऱ्यामागे राहूनही मला तो नेहमीच माझा सिन सुंदर पध्द्तीने समजावून सांगतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करत असताना कुठलेच दडपण येत नाही असे पल्लवी म्हणते. पल्लवी वैद्य ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘पूर्णिमा तळवळकर’ची सख्खी बहीण आहे हे कदाचित अनेकांना माहीत नसावे. प्यार तो होना ही था, मेहबुबा अशा हिंदी मालिकेत पूर्णिमा तळवळकर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या क्यूँ रिश्तों में कट्टी बट्टी ही झी टीव्ही ची हिंदी मालिका त्या अभिनित करत आहेत. रंग माझा वेगळा, फुलपाखरू, वन्स मोअर, होम स्वीट होम, होणार सून मी ह्या घरची अशा चित्रपट आणि मालिकेतून त्यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील बेबीआत्या म्हणून त्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या. अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि पूर्णिमा तळवळकर बहिणींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…