Home News नाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे...

नाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण

1304
0
actor santosh juvekar
actor santosh juvekar

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर ह्याच्या बाबतीत नुकताच एक प्रकार उघड झाला आहे त्यांनी त्याचा खुलासा करत तो मी नव्हेच म्हणत फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत बरच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पोस्ट मध्ये संतोषने घडलेला प्रकार आणि त्याबाबत आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्याने त्या पोस्ट संदर्भात फोटोसह खुलासा करण्याचा प्रयत्न केलेला पहायला मिळतो आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला सपोर्ट दर्शवत संतोष असं काही करूच शकत नाही असं देखील म्हटलं आहे.

actor santosh juvekar

एक पोस्टवर संतोष जुवेकर नावाने (जो अभिनेता नाही) कमेंट केलेली होती त्यात “अलिबाग हे नाव बदलवून अलिबागला नवीन नाव श्रीबाग किंवा सद्गुरूबाग किंवा समर्थबाग ठेवा असं सूचक विधान केलेले पाहायला मिळालं त्यावर मा. श्री प्रशांतजी नाईक ह्यांनी त्या कमेंटला उत्तर देत ” तुमच्यातला फालतू कलाकार काही बोलला म्हणून आम्ही आमच्या गावाचं नाव नाही बदलणार आम्हाला अलिबागचा अभिमान आहे” असं लिहलेलं पाहायला मिळाला. परंतु ह्याचा आणि अभिनेता संतोष जुवेकरचा काही एक संबंध नसल्याने संतोषने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत म्हणाला ” मा. श्री प्रशांतजी नाईक आपला काहीतरी गैरसमज झाला आहे. हे संतोष जुवेकर जे FBaccount आहे ते माझे official account नसून ही comment मी केलेली नाही. आणि अलिबाग आणि अलिबागकार ह्यांच्या बद्दल जेवढं प्रेम आणि आदर तुम्हाला आहे तेवढाच मलाही आहे. कुणाचा बाप आला तरी अलिबाग हे अलिबागच राहणार.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here