झपाटलेला चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता, चित्रपटाला खूपच प्रसिद्धी मिळाली आजही चित्रपट पाहताना वेगळीच मजा येते. त्या चित्रपटावर आधारित तब्बल ३० वर्षानंतर २०१३ साली झपाटलेला २ हा चित्रपट आला पण ह्या चित्रपटाला फारस यश मिळालं नाही. कोणत्याही चित्रपटाला कास्टिंग चांगलं मिळालं तर चित्रपट पाहायला मज्जा येते असंच काहीस ह्या बाबतीतही घडलेलं पाहायला मिळालं.१९९३ सालच्या झपाटलेला चित्रपटात लक्ष्या, दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे, विजय चव्हाण, मधू कांबीकर, पूजा पवार, किशोरी अंबिये असं दिग्गज स्टारकास्ट लाभलं होत. चित्रपटासाठी सर्वानी दिलेलया योगदानामुळेच चित्रपटाला रंग चढला असं म्हणायला हरकत नाही.

सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे लक्ष्या आणि दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. अशोक पाटोळे हे ह्या चित्रपटाचे लेखक होते त्यांनीच ह्या कलाकारांची निवड केली होती. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अभिनेते महेश कोठारे ह्यांना तात्या विंचू ह्यांच्या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर ह्यांचीच निवड का केली असा प्रश्न केला होता. त्यावर महेश कोठारेंनी उत्तर दिल. हि सगळी कमाल लेखक अशोक पाटोळे ह्यांची आहे. त्यांनीच ह्या चित्रपटासाठी कास्टिंग केलं होत. दिलीप प्रभावळकर हे त्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत असं त्यांचं म्हणणं होत. जेव्हा मी आणि अशोक पाटोळे दिलीप प्रभावळकरांकडे ह्या भूमिकेसाठी गेलो हि भूमिका खूप आवडली. त्यांना नेहमी वेगवेगळ्या भूमिका करायला फार आवडतात. तात्या विंचूच्या भूमिकेत दाताची कवळी लावायची आयडिया देखील प्रभावळ करांचीच होती. व्हिलनच्या रोलमध्ये त्यांनी केलेली मेहनत आजही पाहताना मजा येते. खरंतर दिलीप प्रभावळकरांचा ह्या चित्रपटात छोटासाच रोल आहे पण बाहुल्याच्या आवाजात त्यांना शेवटपर्यंत चित्रपटाची धुरा सांभाळावी लागली होती. रामदास पाध्ये आणि त्यांच्या टीमने देखील चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली होती. ह्या सर्वांमुळेच चित्रपट अजरामर झाला असं महेश कोठारे म्हणतात.