स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम राणू अक्का म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी को’रोना काळात मदतीचा हात पुढे केलेला पाहायला मिळाला. रुग्ण आणि त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक या सरावाची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती. हा उपक्रम त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रभर राबवलेला पाहायला मिळाला होता. अश्विनी महांगडे या मूळच्या वाई, साताऱ्याच्या. त्यांचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांच्याच प्रेरणेने त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. यातून काही वर्षांपूर्वी त्यांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली होती. या प्रतिष्ठान मार्फत आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

मग पुस्तक संग्रहालय असो वा रक्तदान शिबिर, को’रोना काळात रुग्णांना बेड मिळवून देणे असो वा विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाकारांना प्रोत्साहन देणे. यासर्व उपक्रमात रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानने नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला पाहायला मिळाला. हे सर्व कौतुक होत असताना आता रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान आणखी एक पाऊल पुढे जाताना दिसत आहे. या प्रतिष्ठान अंतर्गत आज पहिली रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल करण्यात आली आहे. आज १५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी या पहिल्या वहिल्या रुग्णवाहिकेचे पूजन केले आहे. यामुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे यांचे कौतुकही केले जात आहे. अश्विनी महांगडे यांच्या प्रमाणे आणखी एक मराठी अभिनेत्री आपल्या फाऊंडेशनमार्फत राज्यभर मदतीसाठी धावून जाताना दिसते. ही अभिनेत्री आहे दीपाली सय्यद. काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यदने आपल्या चॅरिटी ट्रस्ट मार्फत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी देणार असल्याचे जाहीर केले होते. तर पूरग्रस्त भगत जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी तिने केली होती. त्यामुळे मराठी सृष्टीतील या दोन्ही अभिनेत्री सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात आहेत. केवळ अभिनयापूरत मर्यादित न राहता या अभिनेत्रीचे हे सामाजिक कार्य नेहमीच कौतुकास्पद ठरेल यात शंका नाही.