गेल्या अनेक वर्षांपासून कलाकारांना योग्य मानधन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. यावर शासनाने निर्णय घेतला असून लवकरच कला क्षेत्रातील मंडळींना आता मानधन मिळू शकणार आहे. यात मुख्यत्वेकरून कलाकार , कीर्तनकार, प्रवचनकार, भारुड, गायक, लोकगीत, वादक या सर्व कलाकारांसाठी ही योजना लागू होणार आहे. महिन्याला २४०० रुपये इतके मानधन शासनाकडून मिळणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

सरत्या काळात कलाकार नेहमीच आर्थिक परिस्थिती मुळे किंवा आजारपणामुळे अडचणीत सापडलेले दिसतात. आयुष्यात कलाकारांनी पैशांची तरदूत करून ठेवणे गरजेचे आहे , उधळपट्टी करू नये असे अनेक सल्ले या कलाकारांना कायम मिळताना दिसतात. मात्र त्यांच्यावर ही परिस्थिती का ओढवली याचा विचार कोणीही करताना दिसत नाही. आजही असे अनेक नामवंत कलाकार आहेत ज्यांना पुरेशा पैशाअभावी जीवन व्यतीत करायला लागत आहे. हीच अडचण समजून घेऊन कलाकारांना आता मानधन देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयाचे कालाक्षेत्रातून स्वागत केले जात आहे. कलाकारांना हे मानधन कसे आणि कुठे मिळेल याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ती माहिती पुढीलप्रमाणे…कलाकारांना मानधन मिळावे यासाठी आवश्यक कागदपत्रे- १) रेशनिंग कार्ड झेरॉक्स २) आधार कार्ड ३) शाळा सोडल्याचा दाखला ४) रहिवासी दाखला ५) बँक पासबुक ६) पति,पत्नीचा फोटो,पत्नी नसेल तर स्वःताचा फोटो ७)तहसीलदार.उत्पन्नाचा दाखला उत्पन्न ४०,०००/- च्या आत ८) कलेचा प्रकार उदा.किर्तनकार,प्रवचन,भजणी, भारुड, लोकगीत,वादक,गायक,९) सन २०१० च्या आतील कलेचे पुरावे.उदा.कार्यक्रम पत्रिका,पुरस्कार चिन्ह,सत्काराचे फोटो इ.१०) शिफारस पत्र, वारकरी प्रबोधन समिती महाराष्ट्रराज्य.आणि खासदार,आमदार,जि.प.सदस्य,प.स.सदस्य,सरपंच,नगरसेवक.( किमान २०१० सालाच्या आतील वारकरी संस्था रजिस्टर असावी ) ११) सरकारी लाभ मिळत नसल्याचे नोटिस १००/- रु.च्या स्ट्यम्पपेपरवर लेखी. १२ ) वयाची अट किमान ५० वर्षे १३) सर्व कागदपत्रांच्या प्रत्येकी ३ झेरोक्स सत्यप्रत असावी १४) पंचायत समिती समाज कल्याण खाते या विभागात कागद पत्रांची पूर्तता करून पोच घ्यावी.